करिअरच्या वाटा : भेसळ रोखणारा खाद्य तंत्रज्ञ

सध्या सगळीकडे अन्न भेसळीचे कित्येक किस्से ऐकायला मिळतात. ही भेसळ थोपविण्यात फूड टेक्नॉलॉजिस्टची भूमिका महत्त्वाची असते. हा फूड टेक्नॉलॉजिस्ट नवीन अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर संशोधन करण्यापासून ते वितरकापर्यंत पोहोचण्यापर्यंत कित्येक मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडतो.

फूड टेक्नॉलॉजी हे असे शास्त्र आहे, ज्याची सुरुवात शेतापासून होते आणि त्यापासून धान्य वितरणापर्यंत ही प्रक्रिया सुरूच असते. प्राणी आणि वनस्पतीपासून मिळणाऱ्या अन्नाची प्रक्रिया, सुरक्षा, जतन, उपयुक्तता व परिशीलन यावर फूड टेक्नॉलॉजिस्ट प्रक्रिया करून सुधारित तंत्र विकसित करतो. तसेच असे अन्न मानवी भक्षणासाठी उपयुक्तआहे किंवा नाही ते ठरवतो. नवीन अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर संशोधन व साहाय्य करतो, सध्या अस्तित्वात असलेल्या तंत्रामध्ये सुधारणा सुचवणे, ते स्वस्त कसे होईल, त्याची प्रत उत्तम कशी होईल व ते चविष्ट कसे होईल. विशेषत: शीतगृहात ठेवलेली नाशवंत फळे, भाजीपाला, मांस किंवा मासे, भाजीपाला व फळे हवाबंद करणे, लोणची करणे किंवा त्यांना जलरहित करणे, अन्नावर बुरशी चढू नये यासाठी जंतुनाशके वापरणे, ती नष्ट होऊ नयेत याकडे लक्ष देणे, अन्नामध्ये भेसळ होणे, विशुद्ध होणे यावर लक्ष ठेवणे आणि अन्नातील सत्त्व कायम राहतील यासाठी प्रयत्न करणे, अशी कामे त्याला करावी लागतात. त्यासाठी जैवरासायनिक प्रक्रियेद्वारे अन्न सकस व गुणवत्तादायक कसे होईल हे पाहिले जाते. संशोधनाद्वारे मुख्य अन्नापासून उपपदार्थ निर्माण करणे, कौटुंबिक-औद्योगिक निरुपयोगी पदार्थापासून वेगवेगळे उपपदार्थ तयार करणे, मूळच्या अन्न पदार्थाचे दुसऱ्या पदार्थात रूपांतर करणे अशी सगळी कामे फूड टेक्नॉलॉजिस्टला करावी लागतात.