करिअरच्या वाटा : बना Flower डिझायनर

कोणत्याही समारंभाची शान ठरते ती तिथली सजावट. लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रमाला फुलांची सजावट करण्यावर अनेकांचा भर असतो. ही फुले खूप छान दिसतात. आजकाल कोणत्याही कार्यक्रमाची जबाबदारी इव्हेंट मॅनेजरला दिली जाते.

कोणत्याही समारंभाची शान ठरते ती तिथली सजावट. लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रमाला फुलांची सजावट करण्यावर अनेकांचा भर असतो. ही फुले खूप छान दिसतात. आजकाल कोणत्याही कार्यक्रमाची जबाबदारी इव्हेंट मॅनेजरला दिली जाते. तुम्हालाही सजावटीची आवड असेल तर फ्लोरल डिझायनरचे करिअर निवडता येईल.

– वेगवेगळ्या प्रकारची फुलं बाजारात मिळतात. फ्लोरल डिझायनर्स या फुलांचा खुबीने वापर करून सजावट करतात. फुले, पाने तसेच इतर डेकोरेटिव्ह वस्तूंच्या मदतीने ही सजावट केली जाते. आता तर चॉकलेट्स, फुगे, कँडल्सचा वापर करून सुंदर डिझाइन्स केली जातात.

– डिप्लोमा इन फ्लॉवर डिझायनिंग अँड डेकोरेशनचा अभ्यासक्रम पूर्ण करून या क्षेत्रात करिअर करता येईल.

– फ्लोरिकल्चर, हॉर्टिकल्चर, ऑर्नामेंटल हॉर्टिकल्चरमध्ये डिग्री घेणे अधिक योग्य मानले जाते. यामुळे तुम्हाला प्रत्येक फुलाची वैज्ञानिक माहिती मिळू शकेल.

– प्रत्येक सीझनमधल्या फुलानुसार डिझाइन केले जाते.

– फ्लोरल डिझायनर बनण्यासाठी तुमच्याकडे कल्पकता असणे गरजेचे ठरते. उत्तम संवादकौशल्य तसेच नवे शिकण्याची तयारी असणेही गरजेचे आहे.

– इन्स्टिट्यूट ऑफ फ्लोरल डिझाइन, एफएनपी फ्लोरल डिझाइन स्कूल, मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन, स्कायलाइन बिझनेस स्कूल या ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण करता येतील.