फाईन आर्टची कला

आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे करिअर. त्यामुळे करिअर निवडताना नेहमी जाणीवपूर्वक रीतीने निर्णय घ्यावा लागतो. स्वत:च्या मनाला काय वाटते आणि आपण आपल्यातील कलेला कसा वाव देतो, हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते.

आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे करिअर. त्यामुळे करिअर निवडताना नेहमी जाणीवपूर्वक रीतीने निर्णय घ्यावा लागतो. स्वत:च्या मनाला काय वाटते आणि आपण आपल्यातील कलेला कसा वाव देतो, हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. जेव्हा आपल्या आवडीचा छंद आपल्या करिअरचा भाग बनतो, तेव्हा अजून सोन्याहून पिवळे होते व यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही.दहावी-बारावीनंतर करिअरची उत्तम संधी म्हणजे फाईन आर्ट. आपल्याकडे कोणतीही कला असो, ती कला पुढे नेण्यासाठी चिकाटी, मेहनत, आत्मविश्वास हा लागतोच. हे फाईन आर्टच्या बाबतीतही लागू होते.

अभ्यासक्रम आणि पात्रता

चित्रकला आणि अप्लाईड आर्टच्या चार-चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम बीएफए (बॅचलर इन फाईन आर्ट) साठी विद्यार्थ्यांला बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्यात 2-2 वर्षाच्या एमएफए (मास्टर्स इन फाईन आर्ट)च्या पदवी अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शैक्षणिक संस्थेतील पदवीधारक असावा. याशिवाय डिप्लोमा कोर्सदेखील उपलब्ध आहेत.

संधी

फाईन आर्ट व्यवसायिकास आर्ट स्टुडिओज, जाहिरात संस्था, टेक्सटाईल उद्योग, प्रकाश संस्था, टेलिव्हिजन, फिल्म आणि थिएटर प्रॉडक्शन यात संधी मिळते. याशिवाय शिक्षक रूपातून देखील पर्याय उपलब्ध आहे. आर्ट क्रिटिकच्या रूपातून लिखाणाचे क्षेत्र निवडता येते.

कौशल्य

कलेत करिअर करण्यासाठी उमेदवाराकडे विविध प्रकारचे कौशल्य असणे गरजेचे आहे. उमेदवार हा रचनात्मक आणि कल्पनाशील असायला हवा. त्याला चौकस बाजूंचे ज्ञान हवे. कलेत काम करणा-यांच्या डोळ्यांत आणि हातात अनोखा ताळमेळ असतो. त्यामुळे या क्षेत्रात काम करणारी व्यक्ती आपल्या कामासंबधी धैर्यवादी हवी.