करिअर टिप्स : मुलाखतीला समोरे जाताना

मुलाखतीला अनेकांना सामोरे जावे लागते. मुलाखत म्हटले की, प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न येतात. नेमके काय विचारले जाईल, याचा सर्वात अधी विचार येतो. तुम्ही एक चांगले उमेदवार आहात हे सिद्ध करण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्या. यासाठी मुलाखतीमधील या प्रश्नांची चांगली उत्तरे देऊन तुम्ही किती योग्य आहेत हे दाखवून देऊ शकता.

    स्वत:ची ओळख करून द्या
    प्रत्येक मुलाखतीत हा प्रश्न विचारलाच जातो. मुलाखतदाराची माहिती मिळविण्याच्या हेतूने हा प्रश्न विचारला जातो. याचे उत्तर देताना एखाद्या गोष्टीसारखे न सांगता, कमी शब्दात आणि प्रभावी सांगणे आवश्‍यक आहे. तुमच्या स्किल, अचीवमेंट्‌स आणि स्ट्रेंथ्स यासंबधित माहिती सांगा.

    तुम्ही नोकरी का बदलता?
    मुलाखत घेणारा जाणू इच्छितो की, मुलाखत देणाऱ्याने पूर्वीची नोकरी का सोडली. याचे उत्तर देताना तुम्ही तुमच्या भविष्याला फोकस करून उत्तर द्या. पूर्वीच्या नोकरीबद्दल नकारत्मक सांगण्यापेक्षा सकारत्मक गोष्टींच सांगणे योग्य आहे.

    सर्वश्रेष्ठ गुण काय आहेत?
    हा प्रश्न तुमच्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे. तुम्ही नोकरीसाठी किती योग्य आहात हे यातून सिद्ध होते. यामुळे याचे उत्तर स्पष्ट योग्य आणि काळजीपूर्वक देणे गरजेचे आहे. यावेळी तुमच्या सध्याच्या ज्ञानाबद्दल माहिती सांगा.

    पगाराची अपेक्षा?
    यावरून तुमचा आर्थिकबाबीचा अंदाज घेतला जातो. यावेळी तुमच्या गरजेचा अंदाज सांगणेच योग्य राहील.