करिअर वाटा : कॉर्पोरेट कम्युनिकेशन

कॉर्पोरेट कम्युनिकेशन कोणत्याही कंपनी आणि स्टेकहोल्डर्स वा ग्राहकांदरम्यान संबंध तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावताहेत. कोणत्याही संस्थेत कामावरील देखरेख आणि त्याच्या रिपोर्टिगसाठी कम्युनिकेशनचा उपयोग होतो. साधारण भाषेत सांगायचे झाल्यास, कॉर्पोरेट कम्युनिकेशनच्या अंतर्गत जाहिराती, जनसंपर्क, इंटर्नल कम्युनिकेशन, इन्व्हेस्टर रिलेशन, क्रायसेस मॅनेजमेंट, ब्रँड मॅनेजमेंटसारखी क्षेत्रे येतात.

कॉर्पोरेट कम्युनिकेशन कोणत्याही कंपनी आणि स्टेकहोल्डर्स वा ग्राहकांदरम्यान संबंध तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावताहेत. कोणत्याही संस्थेत कामावरील देखरेख आणि त्याच्या रिपोर्टिगसाठी कम्युनिकेशनचा उपयोग होतो. साधारण भाषेत सांगायचे झाल्यास, कॉर्पोरेट कम्युनिकेशनच्या अंतर्गत जाहिराती, जनसंपर्क, इंटर्नल कम्युनिकेशन, इन्व्हेस्टर रिलेशन, क्रायसेस मॅनेजमेंट, ब्रँड मॅनेजमेंटसारखी क्षेत्रे येतात.

स्पर्धेत टिकण्यासाठी होतो वापर
काही वर्षापूर्वीपर्यंत कंपन्या प्रेस रिलीज देऊन अथवा टीव्हीच्या माध्यमातून आपल्या योजना वा नव्या बदलांची माहिती देत असत. पण, आता कंपन्यांमध्ये कम्युनिकेशनची भूमिका वाढली आहे आणि ते आपल्या योजनांना प्रथमपासून ते शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी लेटर्स, वेबसाईट, सोशल मीडिया आणि कम्युनिटी एंगेजमेंटसारख्या गोष्टींचा आधार घ्यावा लागतो आहे. नव्या पिढीच्या नोकऱ्यांमध्ये जॉब कम्युनिकेशन स्किल्सना (संवाद कौशल्याला) फार महत्त्व दिले जाते आहे. वाढत्या कंपन्यांसह उत्तम संवादकौशल्य असणाऱ्या लोकांसाठी नोकरीच्या शक्यतादेखील वाढत आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे कंपन्या आपली उत्तम प्रतिमा बनवण्यासाठी कॉर्पोरेट कम्युनिकेशनचा अधिक वापर करत आहेत.

असे असते कामाचे स्वरूप
कॉर्पोरेटर कम्युनिकेटर तीच व्यक्ती होते, जी संस्थेचा चेहरा होते. यासाठी आवश्यक असते की, ते कोणत्याही कल्पना स्पष्टपणे लोकांना समजू शकेल अशा पद्धतीने मांडणे. कॉर्पोरेट कम्युनिकेटरसाठी कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी अंतर्गत संवादाच्या माध्यमातून सतत जोडलेले राहणे गरजेचे असते. यासह कंपनीसाठी मीडिया हँडलिंग, दुसऱ्या खात्याशी माहितीची देवाणघेवाण करणे, बिझनेस कॅम्पेनमध्ये सहभागी होणे आणि त्यास उत्तम बनविणे, सीनियर्सना उत्तम संवादासह जोडलेल्या प्रकरणांसह सल्ला देणे, सूचना देणे आणि कंपनीच्या पब्लिक रिलेशन डिपार्टमेंटला लीड करणे यासारखी कामे करावी लागतात.

पात्रता
या क्षेत्रात प्रवेशासाठी कोणतीही निर्धारित पात्रता नाही. इंग्लिश साहित्याची पदवी आणि मास कम्युनिकेशन या एमबीएच्या पदवीसह थोडा अनुभव या क्षेत्रात प्रवेशासाठी सहायक होऊ शकते. मास कम्युनिकेशनमध्ये पदविका वा अन्य व्यावसायिक पदवीदेखील या क्षेत्राशी जोडण्यात उपयोगी आहे. पण, सर्वाधिक संवादकौशल्य आणि नेटवर्किंगसारखी सॉफ्ट स्किल्सही करिअरमध्ये पुढे नेण्यात मदतच करेल.

कुठे करू शकता नोकरी?

– कमर्शियल ऑर्गनायझेशन

– गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन

– इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी

– टूरिझम डिपार्टमेंट

– कंसल्टन्सी फर्म

– फायनेन्शियल सव्र्हिसेस

– एनजीओ