नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी; महावितरणमध्ये पाच हजार पदांची मेगा भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडची (Maharashtra State Electricity Distribution Company Limited MAHADISCOM) सन 2021 ची नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. विद्युत सहाय्यक पदाची तब्बल पाच हजार पदे भरली जाणार आहेत.

    मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. महावितरणमध्ये पाच हजार पदांची मेगा भरती होणार आहे. विद्युत सहाय्यक पदासाठी ही भरती होणार आहे.

    महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडची (Maharashtra State Electricity Distribution Company Limited MAHADISCOM) सन 2021 ची नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. विद्युत सहाय्यक पदाची तब्बल पाच हजार पदे भरली जाणार आहेत.

    सर्वसाधारण 1673, महिला 1500, क्रीडापटू 250, एक्स सर्व्हिसमॅन 750, प्रोजेक्टड 250, भूकंपग्रस्त 99, लर्नर उमेदवार 500 जागा अशा एकूण 5 हजार पदांसाठी पदांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे.

    या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 12 वीची परीक्षा आणि राष्ट्रीय व्यापार प्रशिक्षण प्रमाणपत्र (NTTC) असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या पदावर ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेद्वरांसाठी 18 ते 27 वर्षे अशी वयोमर्यादा आहे.

    18 फेब्रुवारी 2021 पासून सुरू भरती प्रक्रिया सुरु झाली असून, 18 मार्च 2021 पर्यंत अंतिम मुदत आहे. अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना या पदासाठी ऑनलाईन अर्ज करावयाचे असतील त्यांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.