१२ वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी, ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये भरती प्रक्रिया सुरु

पदासाठी अर्ज करण्यासाठी ऑईल इंडिया लिमिटेडच्या www.oil-india.com या संकेत स्थळावर जाऊन दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तसेच या अर्जाची छापील प्रत आपल्या जवळ ठेवावी.

दिल्ली : १२ वी पास असलेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी चालून आली आहे. ऑईल इंडिया लिमिटेडने ऑपरेटरच्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण असलेल्या इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. उमेदवाराने www.oil-india.com या संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज दाखल करायचा आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी १८ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरणे आवश्यक आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षा आणि ड्रायव्हिंग चाचणीच्या माध्यमातून होईल.

पद ऑपरेटर-I (एचएमव्ही), ग्रेडVII

पदांची संख्या – ३६

वेतन – १६ ते ३४ हजार रुपये

पात्रता – इच्छुक उमेदवाराची वयोमर्यादा १८ पूर्ण असावी. तसेच कमाल वयोमर्यादा ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. उमेदवाराची वयोमर्यादेची गणना १८ सप्टेंबर २०२० पासून करण्यात येईल.

नोंदणी शुल्क – या भरतीप्रक्रियेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सामान्य आणि ओबीसी उमेदवाराला २०० रुपये नोंदणी शुल्क आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक १८ सप्टेंबर आहे.

पदासाठी अर्ज करण्यासाठी ऑईल इंडिया लिमिटेडच्या www.oil-india.com या संकेत स्थळावर जाऊन दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तसेच या अर्जाची छापील प्रत आपल्या जवळ ठेवावी.