खुशखबर! भारतातील टॉप ५ आयटी कंपन्यांमध्ये नोकरीची संधी

२०२२ पर्यंत ऑटोमेशनमुळे ३० लाख कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येईल, असा बँक ऑफ अमेरिकेचा अंदाज आहे. या कर्मचारी कपातीमुळे आयटी कंपन्यांची तब्बल १०० अब्ज डॉलर्सची बचत होईल. त्यामुळे आगामी काळात रॉबोट प्रोसेस ऑटोमेशन आयटी क्षेत्रासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

    नवी दिल्ली: तरुण तरुणींसाठी खुशखबर आहे. ज्यांना आयटीमध्ये नोकरी करायची आहे यांच्या साठी भारतातील ५ टॉप आयटी कंपन्यांनी कर्मचारी भरतीचा निर्णय घेतला आहे. नासकॉमच्या माहितीनुसार, यंदाच्या आर्थिक वर्षात भारतातील आघाडीच्या पाच आयटी कंपन्या तब्बल ९६ हजार कर्मचाऱ्यांना भरती करुन घेणार आहेत. त्यामुळे आयटी संबंधित शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    काही दिवसांपूर्वीच बँक ऑफ अमेरिकेन एक अहवाल प्रसिद्ध केला होता. यामध्ये आगामी काळात ऑटोमेशनुळे सॉफ्टवेअर क्षेत्रातील जवळपास ३० लाख नोकऱ्या कमी होतील, असे म्हटले होते. मात्र, त्याचवेळी भारतीय आयटी कंपन्यांमधील रोजगारनिर्मितीचे चित्र सुखावणारी बाब आहे.

    देशात सध्या माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या १.६ कोटी रोजगार उपलब्ध करुन देत आहेत. मात्र, २०२२ पर्यंत ऑटोमेशनमुळे ३० लाख कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येईल, असा बँक ऑफ अमेरिकेचा अंदाज आहे. या कर्मचारी कपातीमुळे आयटी कंपन्यांची तब्बल १०० अब्ज डॉलर्सची बचत होईल. त्यामुळे आगामी काळात रॉबोट प्रोसेस ऑटोमेशन आयटी क्षेत्रासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.मात्र भारतात अजूनही आशादायी चित्र आहे