ई-बिझनेसकडे वाढला कल; तुम्हीही जाणून घ्या नवी संधी

ई कॉमर्स वेबसाईट्‍सच्या मदतीने व्यवसाय वाढवला जात आहे. फेसबुक, ट्विटरवर अनेक ब्रँड्ची स्वतंत्र पेजेस आहेत. अनेक व्यवसाय, व्यवहार सोशल नेटवर्किंगद्वारे किंवा ऑनलाईन होतात.

    अलिकडे इंटरनेटच्या मोठ्या वापरामुळे कारकिर्दीच्या दृष्टीने नवनव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. विविध क्षेत्रात इंटरनेटचा वापर सहजतेने केला जात आहे. आज ई बिझनेसवर अनेकांचा भर आहे. यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांना मागणी वाढत आहे.

    ई कॉमर्स वेबसाईट्‍सच्या मदतीने व्यवसाय वाढवला जात आहे. फेसबुक, ट्विटरवर अनेक ब्रँड्ची स्वतंत्र पेजेस आहेत. अनेक व्यवसाय, व्यवहार सोशल नेटवर्किंगद्वारे किंवा ऑनलाईन होतात. टेकसेव्ही तरुणांना या क्षेत्रात बरीच मोठी मजल मारता येईल.

    या क्षेत्रातील करिअरसाठी काही कौशल्ये अंगी बाणवणे गरजेचे आहे. मुख्यत्वे तुम्हाला माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची चांगली जाण असायला हवी. वेब डिझायनिंगचा कोर्स केला असेल तर उत्तम. तसेच कल्पकता, नवे शिकण्याची तयारी या गोष्टीही गरजेच्या आहेत. मार्केट रिसर्च, ऑनलाईन जाहिरात, ब्रँडिंग, मिडिया प्लॅनिंग याची माहिती असणेही गरजेचे आहे.

    ई बिझनेसशी संबंधित अनेक अभ्यासक्रम आज उपलब्ध आहेत. ऑनलाईन कोर्सही करता येतात.

    बारवीनंतर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. यासाठी बारावीत 50 टक्के गुण असायला हवेत. पदवीनंतरही हे अभ्यासक्रम निवडता येतात. पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा कालावधी दोन वर्षांचा असतो.

    वर्षाला अडीच ते तीन लाखांचे पॅकेज मिळू शकते. कंपनी आणि तुमच्या कौशल्यानुसार उत्पन्नात वाढ होत जाते.