अशी वाढवा मुलांची स्मरणक्षमता

मुलांच्या परीक्षा जवळ की कित्येकदा वाचूनही त्यांचे पाठांतर होत नाही म्हणून इतर पालकांसारखे तुम्हीही त्रस्त आहात का? तसे असेल तर तुम्हाला गरज आहे मुलांची स्मरण क्षमता वाढवण्याची. पुढील सोप्या क्लृप्त्या वापरून तुम्ही या समस्येवर उत्तम तोडगा काढू शकता.

मुलांच्या परीक्षा जवळ की कित्येकदा वाचूनही त्यांचे पाठांतर होत नाही म्हणून इतर पालकांसारखे तुम्हीही त्रस्त आहात का? तसे असेल तर तुम्हाला गरज आहे मुलांची स्मरण क्षमता वाढवण्याची. पुढील सोप्या क्लृप्त्या वापरून तुम्ही या समस्येवर उत्तम तोडगा काढू शकता.

– मुलांना रात्री झोपताना निवांत पडल्यावर दीर्घश्वसन करून वाचलेल्या सर्व गोष्टी आठवण्याची सवय लावा.

– मुले जर एकच उत्तर अनेक वेळा वाचत बसली असतील तर त्यांना ते उत्तर शांत चित्ताने एकदाच वाचायला सांगून आठवेल तितके उत्तर न बघता लिहिण्याचा सराव घ्या.

– मुलांची घोकंपट्टी करण्याची खोड मोडायची असेल तर त्यांना तो धडा किंवा उत्तर समजून घेऊन त्याचे आपल्या भाषेत विश्लेषण करण्यास सांगा.

– भाषेच्या विषयांचा अभ्यास करताना संपूर्ण धडा गोष्टी स्वरूपात त्यांना समजावून सांगा. म्हणजे त्याविषयी आलेल्या कोणत्याही अवांतर प्रश्नाचे उत्तर ते सहज सोडवू शकतील.

– मुलांना दमटावून अभ्यासाला बसवले तर ते रुची घेऊन एकाग्रतेने वाचणार नाहीत. त्यासाठी आधी त्यांना अभ्यासाची गोडी निर्माण होईल यासाठी प्रयत्न करा.

– मुलांशी रोज न विसरता शाळेत शिकवलेल्या अभ्यासासंबंधी हसत खेळत चर्चा करा. त्यामुळे परीक्षेचा अभ्यास करताना त्यांना त्या गोष्टी नवीन वाटणार नाहीत.

– वाचन करताना मुलांना धडय़ातले किंवा उत्तरातले महत्त्वाचे मुद्दे हायलाईट करण्याची सवय लावा. जेणेकरून वाचन करताना ते सहज डोळ्यांसमोर येतील व लक्षातही राहतील.

– धड्यातील एखादे महत्त्वाचे नाव लक्षात राहत नसेल तर त्या शब्दाला यमक जुळेल असा शब्द किंवा एखादी आठवण लक्षात ठेवावी. ज्यामुळे उत्तर लिहिताना तो शब्द न अडता पटकन आठवेल.

– उत्तराचा सिक्वेन्स व्यवस्थित लक्षात ठेवण्यासाठी त्यांच्याकडून प्रत्येक उत्तरातून महत्त्वाचे मुद्दे लिहून काढण्याचा सल्ला द्या. लिहिताना आपण एकाग्र होतो. त्यामुळे लिहिलेली गोष्ट सहज लक्षात राहते.

– मुलांना दररोज लिहिण्याची व एक तरी परिच्छेद वाचण्याची सवय लावा.