करिअरच्या नव्या संधी : दुग्धतंत्रात वाढत्या संधी

सातत्याने नवनव्या तंत्रज्ञानाच्या येण्याने डेअरी उद्योग एक विशेष क्षेत्र झाले आहे. ज्यात दुग्धापासूनची उत्पादन, पुरवठा, साठवणूक, प्रक्रिया आणि वितरण समाविष्ट आहे. या उद्योगात प्रमुख नोक-या उत्पादन आणि प्रक्रियेत आहेत. डेअरी सायंटिस्टच्या प्रमुख रूपात उत्पादन प्रक्रियेसाठी नियुक्त केले जाते.

सातत्याने नवनव्या तंत्रज्ञानाच्या येण्याने डेअरी उद्योग एक विशेष क्षेत्र झाले आहे. ज्यात दुग्धापासूनची उत्पादन, पुरवठा, साठवणूक, प्रक्रिया आणि वितरण समाविष्ट आहे. या उद्योगात प्रमुख नोक-या उत्पादन आणि प्रक्रियेत आहेत. डेअरी सायंटिस्टच्या प्रमुख रूपात उत्पादन प्रक्रियेसाठी नियुक्त केले जाते. विभिन्न प्रकारच्या प्रयोगांद्वारे गाई-म्हशी या जनावरांना दिले जाणारे खाद्य व त्याची गुणवत्ता आणि त्याचा प्रभाव, अनुकूल वातावरण आणि दुधाची गुणवत्ता याचा शोध लागतो आणि यास उत्तम बनविण्यासाठी संशोधन केले जाते. प्रक्रियेत दुधाची साठवणूक करणे, वितरण आणि अन्य याच्याशी संबंधित उत्पादने बनविण्याकामी संधी उपलब्ध आहेत. डेअरी तंत्रज्ञान प्रमुख रूपाने टेक्निकल आणि क्वालिटी कंट्रोलवर लक्ष देतात. याशिवाय प्रक्रियेच्या नवनव्या पद्धती विकसित करणे, उत्पादनांना संरक्षित करण्याच्या प्रक्रियेवरही काम करत आहेत. डेअरी इंजिनीअर हे डेअरी मेंटेनन्सशी संबंधित उपक्रमावर लक्ष ठेवतात. डेअरी तंत्रज्ञानाचा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी आणि खासगी संस्थांसारख्या रूरल बँक, उत्पादन फर्म, मिल्क प्रॉडक्ट प्रोसेसिंग आणि डेअरी फर्ममध्ये करिअरच्या उत्तम शक्यता आहेत. याशिवाय आइस्क्रीम युनिट, क्रिमरी प्रॉडक्ट प्रोसेसिंग यात देखील जॉब करू शकतात.

-असा आहे अभ्यासक्रम
डेअरी उद्योगात करिअर बनविण्यासाठी व्हेटर्नरी सायन्सची पदवी आणि अ‍ॅनिमल हसबन्ड्रीचा कोर्स केला जाऊ शकतो. अनेक संस्थांमध्ये डेअरी टेक्नॉलॉजीत पदविका, पदवी, पदव्युत्तर पीजी कोर्सदेखील आहेत. ज्यात बारावीनंतर प्रवेश घेऊ शकता. सायन्स शाखेत बारावी करणारे विद्यार्थी पदविका वा अंडरग्रॅज्युएट कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतात. अधिकाधिक संस्थांमध्ये प्रवेश हे परीक्षाद्वारेच मिळतात.