SBI बँकेत नोकरीची संधी : हव्या त्या राज्यात काम करता येणार ; ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु

उमेदवार केवळ एका राज्यासाठीच अर्ज करू शकतो. म्हणूनच, त्यांना अर्ज करण्यापूर्वी आपल्याला कोणत्या राज्यासाठी अर्ज करायचा आहे याची खात्री करुन घ्यावी. तसेच त्या राज्यातील स्थानिक भाषा (वाचन, लेखन, बोलणे आणि समजणे) माहित असणे आवश्यक आहे.

  देशातली सर्वात मोठी बँक असलेल्या SBI बँकेत ५ हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु आहे. विशेष म्हणजे आपल्याला हव्या त्या राज्यात काम करण्याची संधी यात उमेदवारांना मिळणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) कारकुनी संवर्गात ज्युनियर असोसिएटच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केली आहे. एकूण ५ हजार २३७ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ मे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर भेट देऊन त्वरित अर्ज करा.

  नोटिफिकेशननुसार उमेदवार केवळ एका राज्यासाठीच अर्ज करू शकतो. म्हणूनच, त्यांना अर्ज करण्यापूर्वी आपल्याला कोणत्या राज्यासाठी अर्ज करायचा आहे याची खात्री करुन घ्यावी. तसेच त्या राज्यातील स्थानिक भाषा (वाचन, लेखन, बोलणे आणि समजणे) माहित असणे आवश्यक आहे.

  एसबीआय भरतीसाठी महत्वाची तारीख
  ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी प्रारंभ तारीख -२७ एप्रिल २०२१
  ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – १७ मे २०२१
  पूर्व परीक्षेचे ट्रेनिंग कॉल लेटर – २६ मे २०२१
  पूर्व परीक्षेची तारीख – जून २०२१
  मुख्य परीक्षा – ३१ जुलै २०२१