नोकरीची संधी : तुम्ही १०वी पास आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची

भारतीय टपाल खात्याने पुन्हा हजारो पदांची भरती काढली आहे.ही भरती दहावी उत्तीर्णांसाठी मोठी संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ५ ऑकटोबर २०२० पासून सुरू झाली आहे. विशेष म्हणजे ही भरती महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये होणार आहे. महाराष्ट्र डाक विभाग प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार “पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ” पदाच्या १३७१रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार आपले अर्ज ३ नोव्हेंबर २०२० पर्यंत सादर करू शकतात. यासाठी १० वी किंवा १२ वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

यासाठी अर्ज कसा करावा पात्रता काय आहेत हे खाली जाणून घ्या. तसेच अधिसूचना आणि अधिकृत संकेतस्थळांच्या लिंक्सही खाली दिल्या आहेत.तर मग वाट कशाची बघताय अर्ज करा अन् मिळवा नोकरी…

पदांची संख्या
महाराष्ट्र पोस्टल सर्कल भरती अंतर्गत पोस्टमन(Postman)च्या १०२९ पदांची भरती करण्यात येणार आहे.
मेल गार्ड (Mail Guard) १५ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
मल्टि टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff)३२७ पदांची भरती होणार आहे

शैक्षणिक पात्रता
मल्टि टास्किंग स्टाफ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्था / बोर्डाकडून दहावी उत्तीर्ण केलेली असावी.तर पोस्टमन,मेल गार्ड पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्था / बोर्डाकडून बारावी उत्तीर्ण केलेली असावी.

वय श्रेणी
डाक खात्यात पोस्टमन, मेल गार्ड पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे व जास्तीत जास्त वय २७ वर्षे निश्चित केले गेले आहे.तर मल्टि टास्किंग स्टाफ पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे व जास्तीत जास्त वय २५ वर्षे निश्चित केले गेले आहे. SC/ST उमेदवारांसाठी ५ वर्ष वयाची सूट आहे तर OBC उमेदवारांसाठी ३ वर्ष वयाची सूट आहे

महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख: ०५ ऑकटोबर २०२०
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०३ नोव्हेंबर २०२०

अर्ज फी
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण, ओबीसी प्रवर्गातील पुरुष उमेदवारांना ५०० रुपये फी भरावी लागेल. एससी/एसटी वर्ग आणि महिला उमेदवारांसाठी १०० रुपये फी आहे.

अर्ज कसा करावा
भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळ www.maharashtrapost.gov.inवर भेट द्यावी लागेल.तसेच ऑनलाईन अर्जासाठी https://dopmah20.onlineapplicationform.org/MHPOST/ येथे क्लिक करावे अर्ज करण्याची अंतिम तारीख ०३ नोव्हेंबर २०२० आहे.

वेतनमान
या विविध पदांसाठी वेतनमान १८,००० ते ६९,१०० रुपये असून नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र आहे.