योग क्षेत्रात बनवा करियर; आर्थिक स्वास्थही राहील सुधृढ

योगाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर शाळा, हेल्थ सेंटर, पंचतारांकित हॉटेल्स, जीम, हेल्थ क्लब, स्पा, रिसॉर्टस अशा ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

    योग प्रशिक्षक बनण्यासाठी फक्त योगासनांचे ज्ञान पुरेसे ठरत नाही तर योगावर निष्ठा असणे गरजेचे आहे. योग प्रशिक्षकाने सतत योगसाधना करत रहायला हवी.

    योग प्रशिक्षक बनण्यासाठी योगाचे व्यावसायिक प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. योगविषयक पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम अनेक संस्थांमध्ये उपलब्ध आहे.

    योगाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर शाळा, हेल्थ सेंटर, पंचतारांकित हॉटेल्स, जीम, हेल्थ क्लब, स्पा, रिसॉर्टस अशा ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

    पुरेशा अनुभवानंतर स्वत:चे योग केंद्र सुरू करता येईल. योग प्रशिक्षक म्हणूज शासकीय संस्थांमध्ये संधी मिळू शकते.

    परदेशामध्ये योगाचा प्रसार होत असल्याने तेथेही चांगल्या संधी मिळतात.
    भारतीय विद्या भवन, दिल्ली इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ योगिक सायन्स अँड रिसर्च, मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ योग, अय्यंगार योग सेंटर पुणे, देवसंस्कृती विद्यापीठ हरिद्वार, पतंजली विद्यापीठ, उत्तराखंड यासारख्या संस्थांमध्ये योगाचे प्रशिक्षण दिले जाते.