भारतीय रेल्वेमध्ये मेगा भरती, परीक्षांसाठी रेल्वेकडून विशेष तयारी

कोविड-१९ महामारीच्या दरम्यान रेल्वेने मेगा भरती सुरु केली आहे. तसेच परीक्षेसाठी सरकारने मोठी तयारी केली आहे. या पदासाठी प्रवेश परीक्षा सुरु झाल्या असून त्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे.

कोविड-१९ महामारीच्या दरम्यान रेल्वेने मेगा भरती सुरु केली आहे. तसेच परीक्षेसाठी सरकारने मोठी तयारी केली आहे. या पदासाठी प्रवेश परीक्षा सुरु झाल्या असून त्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे.

बेरोजगारीच्या काळात भारतीय रेल्वे (Indian Railway)अनेकांसाठी आशेचा किरण बनून आली आहे. भारतीय रेल्वे मध्ये १.४ लाख जागांसाठी भरती निघाली आहे. ज्यात जवळपास २.४४ कोटी होतकरू तरुणांचा समावेश आहे. देशभरातून या रेल्वे भरतीसाठी उमेदवारांनी नोंदणी केली असून सुनिश्चित परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी उमेदवारांसाठी रेल्वेकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यात मास्क, सॅनिटायजर, सोशल डिस्टंसिंग या सर्वांचे पालन होत आहे की नाही याची काळजी घेतली जाणार आहे. तसेच परीक्षा केंद्रावर आलेल्या प्रत्येक उमेदवारांची तपासणी केली जाईल. वेगवेगळ्या राज्यांतून परीक्षेसाठी येणा-या उमेदवारांसाठी विशेष रेल्वे सुरु सोडण्यात आल्या आहेत. तसेच त्या रेल्वेमध्ये सॅनिटायजिंग आणि अन्य सुविधा बरोबर आहेत की नाही याची काळजी घेतली जाणार आहे.