NEET-PG Following JEE Main Exam Postponed

देशात कोरनाची परिस्थिती गंभीर झाली असून लॉकडाऊन आणि अन्य निर्बंधामुळे सर्वच क्षेत्रांवर विपरित परिणाम झाला आहे. यातून शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. NEET-PG पाठोपाठ JEE मेन परीक्षा स्थगित करण्यात आलेय.

    दिल्ली : देशात कोरनाची परिस्थिती गंभीर झाली असून लॉकडाऊन आणि अन्य निर्बंधामुळे सर्वच क्षेत्रांवर विपरित परिणाम झाला आहे. यातून शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. NEET-PG पाठोपाठ JEE मेन परीक्षा स्थगित करण्यात आलेय.

    जेईई मेनची चौथ्य़ा टप्प्यात होणारी परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे जेईई मेन मे सत्राची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली.

    कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता जेईई मेन 2021 (मे) परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले. याआधी जेईई मेन परीक्षा एप्रिल सत्राची परीक्षा स्थगित करण्यात आली होती.