करिअरच्या नव्या संधी : फायनान्समध्ये मास्टरी

करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करणारे एक नवे क्षेत्र म्हणजे बँका, फायनान्स सेक्टर, देश-विदेशी कंपन्या यामध्ये एमएफसी (मास्टर ऑफ फायनान्स). फायनान्समध्ये नवीन तज्ज्ञ तयार करण्याच्या उद्देशाने या कोर्सबरोबरच आता मास्टर ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्ससाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. यासाठी कॉमन टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिल्लीत विविध संस्थांमध्ये चालविल्या जाणाऱ्या कोर्ससाठी प्रवेश मिळण्याची संधी मिळू शकते.

करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करणारे एक नवे क्षेत्र म्हणजे बँका, फायनान्स सेक्टर, देश-विदेशी कंपन्या यामध्ये एमएफसी (मास्टर ऑफ फायनान्स). फायनान्समध्ये नवीन तज्ज्ञ तयार करण्याच्या उद्देशाने या कोर्सबरोबरच आता मास्टर ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्ससाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. यासाठी कॉमन टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिल्लीत विविध संस्थांमध्ये चालविल्या जाणाऱ्या कोर्ससाठी प्रवेश मिळण्याची संधी मिळू शकते.

दोन वर्षाचा कालावधी असतो
हा कोर्स पूर्ण वेळ दोन वर्षाचा असतो. वित्तीय क्षेत्राशी निगडित असलेल्या अनेक विभागांविषयी त्यात माहिती दिली जाते. या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना मॅनेजेरिअल धोरणाशी निगडित असलेली क्षेत्रे (उदा. ऑर्गनायझेशन बिहेविअर, मॅनेजेरियल इकॉनॉमिक्स, कॉन्टिटेटिव्ह टेक्निक, फायनान्स अकाऊंटिंग आणि कॉर्पोरेट लॉ) या संबंधित अभ्यासक्रम शिकवला जातो. त्याशिवाय फायनान्सशी निगडित क्षेत्रे (उदा. फायनान्शियल मॅनेजमेंट, फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस, इंटरनॅशनल फायनान्स आणि इंटरनॅशनल अकाऊंटिंग, इन्व्हेन्ट मॅनेजमेंट आणि प्रोजेक्टचे मूल्यमापन यासंबंधी माहिती दिली जाते. फायनान्स क्षेत्रात विद्यार्थ्यांनी वर्चस्व स्थापन करावे हा यामागचा मुख्य हेतू आहे.

प्रॅक्टिकल प्रशिक्षण
नव्याने सुरू केलेल्या कोर्समध्ये डेरिव्हेटिव्हज आणि रिस्क मॅनेजमेंट, ट्रेझरी मॅनेजमेंट, रिअल इस्टेट मॅनेजमेंट, इन्शुरन्स मॅनेजमेंट, म्युच्युअल फंड, इक्विटी रिसर्च या संबंधीचाही अभ्यासक्रम घेतला जातो. कोर्सबरोबरच यामध्ये ८ ते १० आठवड्यांसाठी प्रॅक्टिकल प्रशिक्षण दिले जाते. काही नामांकित संस्थांमध्ये समर ट्रेनिंग म्हणूनही दिले जाते. उद्योग क्षेत्राशी प्रोजेक्ट वर्क म्हणूनही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे व्यावहारिक ज्ञान आत्मसात करता येते. कोर्सदरम्यान विद्यार्थी वार्षिक कन्व्हेन्शन, कार्यशाळा, वर्कशॉप, रिसर्च यासारख्या अ‍ॅक्टिव्हिटी करत असतात.

परीक्षेची पद्धत
या कोर्सच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना तीन वेगवेगळ्या प्रक्रियांमधून जावे लागते. त्यामध्ये लेखी परीक्षा, गटचर्चा आणि मुलाखत. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित असते. यामध्ये अनेक पर्यायी उत्तरांमधून बरोबर उत्तर शोधणे आवश्यक असते. त्यामध्ये दोनशे प्रश्नांचे वेगवेगळे चार भाग केले जातात.

निवड प्रक्रिया
एमबीएच्या प्रवेश परीक्षेसाठी जे प्रश्न असतात, तसेच एमएफसीच्या प्रवेश परीक्षेच्या प्रश्नांचेही स्वरूप असते. त्यामध्ये करन्ट बिझनेस आणि अर्थशास्त्र यावर अधिक भर देणे गरजेचे आहे. उत्तरपत्रिका सोडविण्याचे स्पीड अधिक असावे. हा फायनान्सशी निगडित कोर्स असल्यामुळे त्यासंबंधीचेही काही प्रश्न विचारले जातात. इंग्रजीमध्ये व्याकरण आणि शब्दांची माहिती यासंबंधीचे प्रश्न असतात. परीक्षेची तयारी करण्याचा उत्तम पर्याय म्हणजे कॅट किंवा एमबीए चाचणी परीक्षेच्या प्रश्नप्रत्रिकांचा अभ्यास करत राहणे. चालू घडामोडींसाठी व्यवसायाशी निगडित असलेली मासिके आणि वृत्तपत्रांचे नियमित वाचन करणे आवश्यक आहे. लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना समूह चर्चेसाठी आणि मुलाखतीला बोलावले जाते. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि अभिव्यक्ती शैली या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले जाते. विश्लेषण क्षमता आणि नेतृत्वगुण पाहिले जातात. त्यासाठी वेगवेगळे पॅनेल केले जातात. या सगळ्या प्रक्रियेतून गेल्यानंतर अंतिम यादी केली जाते.