बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची संधी, ३०जून अर्ज करण्याची अंतिम मुदत ; मिळू शकतो इतका पगार

स्टेट बँक ऑफ सिक्कीममधील असिस्टंट मॅनेजरच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून अर्थशास्त्र, लेखा, वाणिज्य, वित्त व्यवस्थापन विषयांत पदवी असणे आवश्यक आहे. यासह, सिक्कीम राज्याच्या भाषेचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे.

    मुंबई: कोरोनाच्या मारामारीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्याचे समोर आले आहे. अनेक शिक्षित तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी सध्या चालून आली आहे. बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांना सिक्कीम स्टेट बँकमध्ये अर्ज करण्याची सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ सिक्कीमने सहाय्यक व्यवस्थापक पदावर(bank Of Sikkim recruitment bank Assistant manager) भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट statebankofsikkim.com वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

    पदांची संख्या किती?

    स्टेट बँक ऑफ सिक्कीममध्ये या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक व्यवस्थापकाची एकूण २६ पदे नेमणूक केली जातील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून२०२१ आहे. या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ०१ जून २०२१ पासून सुरु झालेली आहे.

    शैक्षणिक पात्रता ही हवी

    स्टेट बँक ऑफ सिक्कीममधील असिस्टंट मॅनेजरच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून अर्थशास्त्र, लेखा, वाणिज्य, वित्त व्यवस्थापन विषयांत पदवी असणे आवश्यक आहे. यासह, सिक्कीम राज्याच्या भाषेचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे.

    वयोमर्यादा किती?

    या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी २१ वर्षे आणि जास्तीत जास्त ३० वर्षे आहे.

    निवड प्रक्रिया

    पात्र उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

    पगार किती?

    सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३९, १०० ते ५७, ३६७ रुपये पगार देण्यात येईल. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करु शकता…