नोकरीच्या शोधात असलेल्याच टेन्शन होणार कमी! यंदा कंपन्यांमध्ये मेगा भरती.

जवळपास ६० टक्के कंपन्या नव्या पदांसाठी कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहेत. त्यामुळे क्षमता आणि योग्यता असलेल्या व्यक्तींना येत्या काही महिन्यांत रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. एका विशिष्ट कामात कौशल्य मिळवलेल्या व्यक्तींसाठी आता चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आशा व्यक्तींना नोकरी मिळवणं फारसं अवघड जाणार नाही.

    नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना व्हायरचा फटका हा सगळ्याच क्षेत्राला बसला आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्था सुध्दा ढसळत चालली आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लाॅकडाऊन लावण्यात आला. त्यामुळे त्याचा फटका हा अनेक उद्योगधंद्यांना बसला. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांना पगार कपात सहन करावी लागली. मात्र आता नोकरी शोधणाऱ्या साठी नवीन संधी उपलब्ध होणार आहे. या वर्षात ६० टक्के कंपन्या भरती प्रक्रिया राबवणार आहे. त्यामुळे अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. व्हरच्युअल माध्यमातून मुलाखती घेत अनेक कंपन्यांनी एप्रिल, मे पासूनच भरती प्रक्रिया सुरू केली आहे. जुलै पासून ही भरती प्रक्रिये अधिक वेगाने राबविण्यात येणार आहे.

    लाॅकडाऊनचा प्रचंड मोठा फटका कंपन्यांना बसला आहे. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. मात्र आता कंपन्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. Mercer Mettl न याबाबतचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. परिस्थिती लवकरच सुधारले आणि कोरोनाचं संकट येण्यापूर्वी जशी परिस्थिती होती, तशीच परिस्थिती पुन्हा होईल अशी आशा कंपन्यांना आहे. त्यामुळेच कंपन्या कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याचं Mercer Mettlनं आपल्या अहवालात म्हटले आहे.

    जवळपास ६० टक्के कंपन्या नव्या पदांसाठी कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहेत. त्यामुळे क्षमता आणि योग्यता असलेल्या व्यक्तींना येत्या काही महिन्यांत रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. एका विशिष्ट कामात कौशल्य मिळवलेल्या व्यक्तींसाठी आता चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आशा व्यक्तींना नोकरी मिळवणं फारसं अवघड जाणार नाही.

    Mercer Mettlनं केलेल्या सर्वेक्षणातून एक लक्षणीय बाब समोर आली आहे. एप्रिल, मे मध्ये बऱ्याच ठिकाणी लाॅकडाऊन असूनही अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची भरती केली. Mercer Mettlच्या सर्वेक्षणानुसार भविष्यात कंपन्या व्हरच्युअल हायरिंगला प्राधान्य देतील. लाॅकडाऊनच्या काळात जवळपास ८१ टक्के कंपन्या कर्मचारी भरतीसाठी व्हरच्युअल प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कर्मचारी भरतीचा वेग स्थिर असेल, असे सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे.