uppcl je recruitment 2020 notification released salary according to 7th cpc apply now

अंतिम टप्प्यात निवडण्यात आलेल्या उमेदवारांना ७ व्या वेतन आयोगानुसार (7th CPC), कमीतकमी ४४,९०० रुपयांसह डीए आणि अन्य भत्ते यासह नियमानुसार नोकरी देण्यात येणार आहे.

उत्तरप्रदेश पावर कॉर्पोरेशन लिमिडेटने (UPPCL) ट्रेनी ज्युनियर इंजिनिअर (JE) च्या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती परिक्षेच्या माध्यमातून एकूण २१२ रिक्त पदांसाठी होणार आहे. निवड होण्यासाठी उमेदवारांना संगणकावर आधारित परीक्षेत उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे

आणि upenergy.in वर ऑनलाइन अर्ज करण्यासाठीचा अंतिम दिनांक २८ डिसेंबर आहे. उमेदवारांना अर्जाचे शुल्क ३० डिसेंबरपर्यंत जमा करायचे आहे. परीक्षाफेब्रुवारी २०२१ मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

उमेदवारांना एक तीन तासांच्या परीक्षेत उतीर्ण व्हावे लागेल. ज्यात २०० मार्कांसाठी १५० विचारले जाणार आहेत. परीक्षेत १/४ मार्क चुकीच्या उत्तरासाठी वजाकरण्यात येणार आहेत. परिक्षेत पात्र होण्यासाठी उमेदवारांना ३० टक्के गुण मिळवणे अनिवार्य असणार आहे. परीक्षा झाल्यानंतर एक कॅटेगरी प्रमाणे गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. याच्या आधारावर उमेदवारांची निवड करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण कालावधी पूर्ण करावा लागेल.

अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी १८ वर्ष पूर्ण असायला हवे आणि वयाची मर्यादा ४० वर्षांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. तीन वर्षांचा पदविका(Diploma) अभ्यासक्रम किंवा समकक्ष पदवीधारकांना या नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे.

उमेदवारांना १,००० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. उत्तरप्रदेशचे रहिवासी असल्यास अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठीचे शुल्क ७००/- रुपये आहे. शारीरिकदृष्ट्या दिव्यांग उमेदवारांसाठी शुल्क १० रुपये आहे. अंतिम फेरीतून निवड झालेल्या उमेदवारांना ७ व्या वेतन आयोगानुसार (7th CPC) कमीतकमी वेतन ४४,९०० रुपयांसह डीए आणि अन्य भत्ते यासह नियमांनुसार नोकरी देण्यात येईल.