ही कंपनी देतेय Chicken Dippers खाण्यासाठी १ लाख पगार, असा करा अर्ज

UK ची प्रसिद्ध फिश फिंगर कंपनी BirdsEye ने एक ‘टेस्टर’ च्या पदासाठीची जागा असल्याचे म्हटले आहे. होय, कंपनी अशा व्यक्तीच्या शोधात आहे, जी परफेक्ट चिकन टेस्टर असायला हवी आणि हे काम ती उत्तम प्रकारे करू शकेल. कंपनीने या नोकरीची संबंधित माहितीही शेअर केली आहे. यासाठी कंपनी त्याला १ लाख रुपये पगारही देणार आहे.

    नवी दिल्ली : प्रत्येकाला वाटतं की, आपण बक्कळ पैसे कमवावेत. तर अनेकदा काहीजण जास्त पगार हवा म्हणून आपलं प्रोफेशन सोडून अन्य प्रोफेशनचीही कास धरतात. अशातच तुम्हाला कोणी म्हटलं की, तुम्हाला चविष्ट चिकन भजी खाण्यासाठी जास्तीत-जास्त १ लाख पगार म्हणून देण्यात येतील, तर तुम्ही काय कराल? तसं तर कोणीही माणूस ही ऑफर लगेचच एक्सेप्ट करेल. वास्तविक नोकरीची ही ऑफर UK स्थित एका फूड कंपनीने दिली आहे. यासाठी त्यांनी एक जाहिरात (online advertisement) देखील दिली आहे.

    आपल्याला टेस्ट करावे लागतील चविष्ट चिकन डिपर्स

    उपलब्ध माहितीनुसार UK ची प्रसिद्ध फिश फिंगर कंपनी BirdsEye ने एक ‘टेस्टर’ च्या पदासाठीची जागा असल्याचे म्हटले आहे. होय, कंपनी अशा व्यक्तीच्या शोधात आहे, जी परफेक्ट चिकन टेस्टर असायला हवी आणि हे काम ती उत्तम प्रकारे करू शकेल. कंपनीने या नोकरीची संबंधित माहितीही शेअर केली आहे. यासाठी कंपनी त्याला १ लाख रुपये पगारही देणार आहे. जी कोणी व्यक्ती ही नोकरी मिळविण्यासाठी यशस्वी होईल, त्याला चीफ डिप्पिंग ऑफिसर (Birds Eye Chief Dipping Officer) ची राजेशाही पोस्टही देण्यात येईल.

    असा करावा लागेल अर्ज

    जर तुम्हीही या नोकरीसाठी इच्छुक असाल तर तुम्हाला https://www.birdseye.co.uk/ या लिंकवर जाऊन अर्ज करावा लागेल. याशिवाय तुम्ही birdseyeHR@chiefdippingofficer.co.uk वर २५० शब्दांचं एक पत्र पाठवूनही हे सांगू शकता की, तुम्हाला ही नोकरी का हवी आहे? जर कंपनीला तुमचं उत्तर आवडलं तर तुम्हाला ही नोकरी मिळाली म्हणूनच समजा आणि इतर कोणास ठाऊक की, तुम्ही आनंददायक आणि मजेदार चिकन डिपर्सचा आनंद घेत असाल.