Dial 155260, get your money back online

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलामुळे नवनवीन रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. या सेवा क्षेत्रात व्यावसायिक कौशल्ये देखील तितकेच महत्वाची आहेत. उदयोन्मुख माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. कुशल प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळावे यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि नॅसकॉम (नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनिज) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले(Big Data Analytics, Cyber ​​Security will get free training of many latest courses).

    मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलामुळे नवनवीन रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. या सेवा क्षेत्रात व्यावसायिक कौशल्ये देखील तितकेच महत्वाची आहेत. उदयोन्मुख माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. कुशल प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळावे यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि नॅसकॉम (नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनिज) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले(Big Data Analytics, Cyber ​​Security will get free training of many latest courses).

    सामंत यांच्या शासकीय निवासस्थानी उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि नॅसकॉम यांच्यात कौशल्य वृद्धीसाठी सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, तंत्रशिक्षण संचालक अभय वाघ, नॅसकॉमचे संचालक डॉ. चेतन सामंत, विजय चौघुले, सचिन म्हस्के, श्रीदेवी सिरा उपस्थित होते.

    भारतासारख्या विकसनशील देशात सेवा क्षेत्र जलदगतीने वृद्धिंगत होत आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात सेवा क्षेत्राचा वाटा लक्षणीय आहे. माहिती तंत्रज्ञानावर आधारित ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, झोमॅटो या सारख्या कंपन्या, भीम, पेटीएम या सारखे ॲप, ‘आधार’ बेस्ड ई के वाय सी च्या आधारे डिजिटल बँकिंग सारख्या सुविधा, रेल्वे, बस वाहतूक यांची ॲप आधारित सेवा, ग्राहकांची रुची, खरेदीचा पॅटर्न, खरेदीचे ठिकाण इत्यादी बाबींचे पृथक्करण करून मार्केटिंग करण्याचा सल्ला देणाऱ्या कंपन्या, स्मार्ट वातानुकूलित यंत्रे, स्मार्ट तंत्रज्ञानावर आधारित वाहने, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता इंटरनेट ऑफ थिंग्स अशा माहिती तंत्रज्ञानाच्या युगात योग्य प्रशिक्षण मिळाल्यास रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील असे सामंत म्हणाले.

    सेवा क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि आज असलेली डिजिटल तंत्रज्ञानस्नेही तरुण पिढीची उपलब्धता लक्षात घेऊन हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामुळे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध होऊन सेवा क्षेत्रास भरीव योगदान दिले जाईल, असेही सामंत यांनी सांगितले.

    या सामंजस्य करारानुसार राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुकलाशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग तंत्रज्ञान, कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन शिक्षक यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाने नॅसकॉम च्या सहकार्याने नॅसकॉम यांनी फ्युचर स्किल्स प्राईम (Future Skills Prime) हे ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

    फ्युचर स्किल्स प्राईम (Future Skills Prime) या ऑनलाईन व्यासपीठावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना आवश्यक असणारी प्रमाणित कौशल्ये विकसित करणारे ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ज्या उमेद्वारांना नवीन कौशल्ये आत्मसात करायची आहेत अथवा प्रशिक्षित उमेदवारांना आणखी प्रगत कौशल्ये आत्मसात करायची आहेत अशा उमेदवारांना येथे नोंदणी करुन ऑनलाईन कौशल्य विषयक अभ्यासक्रम शिकता येतील. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना चाचणीनंतर प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

    अभ्यासक्रम केवळ गणित, विज्ञान-तंत्रज्ञान व अभियांत्रिकी शाखांच्या विद्यार्थ्यांपुरतेच मर्यादित नसून या शाखा व्यतिरिक्त इतर शाखा उदा. वाणिज्य, कला या शाखेतील विद्यार्थ्यांनादेखील आपली आवड आणि कल लक्षात घेऊन प्रशिक्षण घेता येईल. अंदाजे एक लाख उमेदवारांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट या सामंजस्य कराराद्वारे निर्धारित केले आहे.

    या ऑनलाईन व्यासपीठावर सद्य:स्थितीत एकूण 202 अभ्यासक्रम तयार असून त्यापैकी 43 अभ्यासक्रम नि:शुल्क आहेत. तर 159 अभ्यासक्रम सशुल्क आहेत. हे सर्व अभ्यासक्रम मूलतः Big Data Analytics, Cyber Security, Internet of Things (IoT), Augmented Reality/ Virtual Reality, Artificial Intelligence and Cloud Technologies या उदयोन्मुख तंत्रज्ञानाशी संबंधित प्रमाणित अभ्यासक्रम आहेत. तथापि, औद्योगिक जगतास Design Thinking Project Management या सारख्या विषयातील प्रशिक्षित मनुष्यबळाची देखील मोठी गरज भासते ही बाब लक्षात घेऊन हे अभ्यासक्रम आखण्यात आला आहे.

    ऑनलाईन व्यासपीठावर उपलब्ध अभ्यासक्रम (1) Digital Awareness/Pathways (2), Foundation Courses (3.) National Occupational Standard Aligned content /Deep Skill Courses आणि (4) Bridge Courses त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे रोजगार विषयक ध्येय सध्या करताना एखाद्या विशिष्ट तंत्रज्ञानाचे नेमके कोण कोणते ऑनलाईन विषय शिकणे आवश्यक आहे ते कळू शकणार आहे.

    या व्यासपीठावर केवळ ऑनलाईन अभ्यासक्रमच नाही तर कल चाचणी (Aptitude) कल व क्षमता निदान ( Capability Diagnosis ) या सुविधा आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना करियर विषयक नियोजन करण्यास मदत होईल.

    या सामंजस्य करारांतर्गत राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकवर्ग यांचे प्रशिक्षणासाठी नोंदणी, प्रशिक्षण दरम्यान व प्रशिक्षण झाल्यानंतरचे मूल्यमापन प्रमाणीकरण आणि यासंबंधीची सर्व सांख्यिकी आणि विश्लेषण प्रशासनास उपलब्ध करून देणे, यासाठी राज्य स्तरावर एक राज्यस्तरीय नोडल टीम तयार करण्यात येणार आहे.

    या टीममध्ये तंत्र शिक्षण संचालनालय, उच्च शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास अकॅडेमी यांचे प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. ही नोडल टीम नॅसकॉमचे वतीने ITITES Sector Skills Council या नॅसकॉम च्या उपविभागासमवेत काम करेल व उपक्रमाचे मूल्यमापन सनियंत्रण केले जाईल.