करिअर वाटा : पाककलेतील उद्योजक

पाककलेत आपल्याला जास्तीत जास्त किती नफा मिळेल याचा विचार करावा लागतो, कारण त्या व्यवसायाची व्याप्ती आधीपासूनच माहीत असायला हवी. आपल्याकडे असलेल्या कौशल्याचा, अनुभवाचा आपल्या व्यवसायात तग धरून राहण्यास मदत होते. वेगवेगळ्या क्षेत्रांत वेगवेगळी कौशल्ये आवश्यक असतात. हॉटेल, रिअल इस्टेट, आयटी अशा मोठ्या क्षेत्रात उद्योग सुरू करायचा असेल, तर त्याप्रमाणे स्वत:चा कौशल्यविकास करून घेणे आवश्यक आहे.

पाककलेत आपल्याला जास्तीत जास्त किती नफा मिळेल याचा विचार करावा लागतो, कारण त्या व्यवसायाची व्याप्ती आधीपासूनच माहीत असायला हवी. आपल्याकडे असलेल्या कौशल्याचा, अनुभवाचा आपल्या व्यवसायात तग धरून राहण्यास मदत होते. वेगवेगळ्या क्षेत्रांत वेगवेगळी कौशल्ये आवश्यक असतात. हॉटेल, रिअल इस्टेट, आयटी अशा मोठ्या क्षेत्रात उद्योग सुरू करायचा असेल, तर त्याप्रमाणे स्वत:चा कौशल्यविकास करून घेणे आवश्यक आहे. या सगळ्यांसाठी लागते ते म्हणजे भांडवल, उत्तम नियोजन, अभ्यासू प्रवृत्ती, आणि कौशल्य. छोट्या स्वरूपात सुरुवातीला उद्योग सुरू करायचा म्हटले की, स्त्रियांसाठी पाककला हे उत्तम क्षेत्र ठरू शकते. ज्या स्त्रियांना घरातूनच व्यवसाय करायची इच्छा आहे त्या घरच्या घरी किंवा लहान जागेत कमीत कमी भांडवलावर डबे पुरवणे, केटिरिंग चालवणे असे व्यवसाय करू शकतात. त्यासाठी मात्र तुमच्याकडे ‘फूड आणि ड्रग्ज’चे परवाने असणे आवश्यक आहे. ते ऑनलाईनदेखील उपलब्ध आहेत. आपल्याला दैनंदिन जीवनातदेखील अनेक कार्यालयात महिला डबे पुरवू शकतात.

अनेक पर्याय उपलब्ध

आपल्या स्त्रिया घर चालवताना, कुटुंब सांभाळताना आपोआपच व्यवस्थापन करत असतात. व्यवस्थापनाचे हे कौशल्य आपण व्यवसायातही उपयोगात आणू शकतो. ग्राहक सेवा देणे म्हणजे लोकांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी सेवा हवी असते त्यासाठी घरच्या घरी, छोटेखानी, घरच्यांच्या वेळा सांभाळून आहारगृह सेवा केंद्रे उभारली, तर स्त्रिया ते उत्तम प्रकारे चालवू शकतात. अनेक लोकांना ऑफिससाठी जेवण हवे असते, यांना या माध्यमातून जेवण पुरवले जावू शकते.

हटके पदार्थांची द्या मेजवानी

आपण पाककला हॉटेल मॅनेजमेन्ट कोर्स करून किंवा उत्तम शेफकडून सुद्धा शिकू शकतो. आज जे मोठमोठे आपण शेफ पाहतो त्यांनी पाकलेला गांभीर्याने घेत यात करिअर केले व ते आज प्रसिद्ध आहेत. वेगवेगळे पदार्थ हटके तयार करून, आपल्याकडे लक्ष आकर्षित करून घेणे ही पाककलेतील महत्त्वपूर्ण कला मानली जाते व पाककलेत वेगवेगळे प्रयोग करणे हे पण तितकेच महत्त्वाचे आहे. आज मार्केटमध्ये उत्तम शेफला प्रचंड प्रमाणात मागणी आहे. तुम्ही मोठ मोठ्या जेवणाच्या, पार्टीच्या ऑर्डर घेऊ शकता, यातून चांगल्या प्रकारे पैसा मिळू शकतो. महिलांनी कॅटरिंगचा व्यवसायात उतरून, स्वत:ला सिद्ध करूनच आपण ‘स्वयंसिद्धा’ आहोत हे दाखवून देऊ शकतो.