करिअर वाटा : अभियांत्रिकीच्या विस्तारित विद्याशाखा

स्थापत्य विद्याशाखेपासून रुजवात झालेली अभियांत्रिकी शाखा आता वटवृक्षामध्ये रूपांतरित झाली आहे. महाराष्ट्रात अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) प्रशिक्षण प्रदान करणाऱ्या सुमारे ६०० पेक्षा जास्त संस्था असून, २ लाखांपेक्षा जास्त प्रवेश क्षमता आहे. विद्याशाखांचा सातत्याने विकास होत असून परस्परांमध्ये सरमिसळ होऊन आंतरविद्या शाखा तयार होत आहेत.

स्थापत्य विद्याशाखेपासून रुजवात झालेली अभियांत्रिकी शाखा आता वटवृक्षामध्ये रूपांतरित झाली आहे. महाराष्ट्रात अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) प्रशिक्षण प्रदान करणाऱ्या सुमारे ६०० पेक्षा जास्त संस्था असून, २ लाखांपेक्षा जास्त प्रवेश क्षमता आहे. विद्याशाखांचा सातत्याने विकास होत असून परस्परांमध्ये सरमिसळ होऊन आंतरविद्या शाखा तयार होत आहेत. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, केमिकल टेक्स्टाईल इ. विद्याशाखांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. अभियांत्रिकीच्या विद्याशाखांनी १०० चा पल्ला कधीच गाठला आहे व पुढील घोडदौड सुरूच आहे.

उदयोन्मुख विद्याशाखा व पायाभूत सुविधांबाबतीत विस्तारित मृद अभियांत्रिकी, इन्व्हायरमेंटल अभियांत्रिकी, टाऊन प्लानिंग, स्ट्रक्रल इंजिनीअरिंग इ. शाखा विस्तारित आहेत, तर उद्योग आस्थापनांमध्ये इंडस्ट्रिअल ऑटोमेशन, मरिन इंजिनीअरिंग, अँरॉनॉटिकल इंजिनीअरिंग, सिरॅमिक इंजिनीअरिंग, फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी, प्रॉडक्ट डिझाईन, ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग, मेकॅट्रॉनिक्स (मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक्सची आंतरशाखा), प्रॉडक्ट डिझाईन इ. अनेक विद्याशाखा उपलब्ध आहेत. माइनिंग व माईन सव्हेईंग, मेटलर्जी, फाउंड्री टेक्नॉलॉजी इ. अनेक पर्यायदेखील उपलब्ध होऊ शकतील.

विद्युत अभियांत्रिकीशी संलग्न पॉवर इलेक्ट्रिकल, कंट्रोल इंजिनीअरिंग, रिलायबिलिटी इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स इ. विस्तारित पर्याय उपलब्ध होऊ शकतील. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रमेंटेशन इंजिनीअरिंग, बायोमेडिकल इंजिनीअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, अ‍ॅनिमेशन इंजिनीअरिंग, इंटरनेट टेक्नॉलॉजी, मायक्रोचीप टेक्नॉलॉजी इ. चा झपाट्याने प्रचार-प्रसार होत आहे.

केमिकल इंजिनीअरिंगच्या विस्तारित शाखांमध्ये प्रामुख्याने पेट्रोकेमिकल इंजिनीअरिंग, फार्मास्युटिकल अ‍ॅण्ड फाईन केमिकल, टेक्स्टाईल केमिस्ट्री, पेंट टेक्नॉलॉजी इ. विस्तारित विद्याशाखा निगडित आहेत. टेक्स्टाईल इंजिनीअरिंग क्षेत्राशी निगडित विद्याशाखांचा विस्तार होऊन निटिंग टेक्नॉलॉजी, मॅनमेड फायबर मॅन्युफॅक्रिंग, फॅशन डिझाइनिंग, ड्रेस डिझाइनिंग अ‍ॅण्ड गारमेंट मॅन्युफॅक्रिंग, फॅशन टेक्नॉलॉजी इ. विद्याशाखांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत.वरील विद्याशाखांव्यतिरिक्त रबर विषयाचा सखोल अभ्यास/प्रशिक्षण देणारी रबर टेक्नॉलॉजी आहे, तर मुद्रणशास्त्राचा विकास करणारी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आहे.