पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर

राज्यातील पोलीस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत ११.८० लाख अर्ज प्राप्त झाले असल्याचे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे.

    मुंबई- राज्यात पोलीस भरतीची (Police Recruitment) तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी (Good News) समोर आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. आता अर्ज भरण्यासाठी आता १५ दिवसांची मुदतवाढ (Extension) देण्यात आली असून फडणवीस यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

    राज्यातील पोलीस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत ११.८० लाख अर्ज प्राप्त झाले असल्याचे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त (Earthquake Sufferer) उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे.

    पुढील काही दिवसात राज्यात जवळपास २० हजार पोलीस भरती केली जाणार असून यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख ३० नोव्हेंबर आहे. दरम्यान पोलीस भरती प्रक्रियेसाठीच्या राज्य शासनाच्या वेबसाईटमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास मुदत वाढ द्यावी अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे.