Golden job opportunities in SBI and HDFC Bank; Bumper recruitment of thousands of posts

लॉकडाऊन मुळे नोकरी गमावलेल्या अथवा नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी SBI आणि HDFC बँकेत नोकरीची सुवर्ण संधी आहे. SBI आणि HDFC बँकेत हजारो पदांची बंपर भरती होणार आहे. SBI मध्ये 606 रिक्त पदे तर HDFC बँकेत 2500 पदे भरली जाणार आहेत.

    मुंबई : लॉकडाऊन मुळे नोकरी गमावलेल्या अथवा नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी SBI आणि HDFC बँकेत नोकरीची सुवर्ण संधी आहे. SBI आणि HDFC बँकेत हजारो पदांची बंपर भरती होणार आहे. SBI मध्ये 606 रिक्त पदे तर HDFC बँकेत 2500 पदे भरली जाणार आहेत.

    स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) अंतर्गत “विशेषज्ञ संवर्ग अधिकारी (व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, कार्यकारी, संबंध व्यवस्थापक, ग्राहक संबंध कार्यकारी, गुंतवणूक अधिकारी, केंद्रीय संशोधन संघ, केंद्रीय संशोधन संघ)“ पदाच्या एकूण 606 रिक्त पदांची भरती होणार आहे.
    या पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 28 सप्टेंबर 2021 असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2021 आहे.  ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. General, OBC and EWS या गटांकरीता 750 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. sbi.co.in या वेबसाईटवर अर्ज भरु शकता.

    एचडीएफसी आपले जाळे ग्रामीण भागात विस्तारणार असून 2500 हून अधिक जणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. येत्या काही दिवसात एचडीएफसी दोन लाख गावांपर्यंत पोहोचणार आहे. यासाठी बँकेतर्फे पुढील सहा महिन्यांत २ हजार ५०० जणांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. लवरकच याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.