Good luck to everyone! Bumper recruitment in India's IT sector; 4.5 lakh people will get jobs

कोरोनानंतर देशांतर्गत बाजारपेठा पूर्ववत होताच पुन्हा एकदा भारतीय आयटी सेवा क्षेत्रात नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. आर्थिक वर्ष 2022 च्या उत्तरार्धात सुमारे 4.5 लाख नवीन नोकऱ्या उपलब्ध होतील, असे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे(Good luck to everyone! Bumper recruitment in India's IT sector; 4.5 lakh people will get jobs).

    मुंबई : कोरोनानंतर देशांतर्गत बाजारपेठा पूर्ववत होताच पुन्हा एकदा भारतीय आयटी सेवा क्षेत्रात नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. आर्थिक वर्ष 2022 च्या उत्तरार्धात सुमारे 4.5 लाख नवीन नोकऱ्या उपलब्ध होतील, असे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे(Good luck to everyone! Bumper recruitment in India’s IT sector; 4.5 lakh people will get jobs).

    मार्केट इंटेलिजन्स फर्म अन अर्थ इनसाईटच्या मते, आयटी सेवा क्षेत्रात आर्थिक वर्ष 22 च्या दुसऱ्या सहामाहीत सुमारे 17-19 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. ज्यामुळे आयटी सेवा उद्योगात 1.75 लाख निव्वळ कर्मचाऱ्यांची वाढ होईल. आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये पहिल्या सहामाहीच्या तुलनेत वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत 12 टक्क्यांहून अधिक कर्मचारी भरती होण्याची अपेक्षा आहे.

    अहवालानुसार, 2022 या आर्थिक वर्षात भारतीय आयटी सेवा क्षेत्राच्या महसुलात 16-18 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. देशांतर्गत आणि बहुराष्ट्रीय अशा 30 हून अधिक आयटी सेवा कंपन्या आर्थिक वर्षात 2,50,000 हून अधिक फ्रेशर्सला जॉबच्या संधी देतील अशी अपेक्षा आहे.