टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर व्हीडिओ कसे बनवायचे?  ‘या’ विद्यापीठात दिले जाते स्पेशल ट्रेनिंग

टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर व्हीडिओ बनवणाऱ्यांची संख्या देशभरामध्ये तसेच जगभरात कमी नाही. काहीजण यामधून चांगली कमाई करतात. मात्र असे करणाऱ्या अनेकांकडे योग्य प्रकारचे प्रशिक्षण नसते. याच गोष्टीची दखल घेऊन अमेरिकेतील एका विद्यापीठाने अधिकृतपणे ऑनलाइन व्हीडिओ बनवण्यासाठीचे आणि त्या माध्यमातून पैसे कमविण्याचे कौशल्य शिकविणारे शिक्षण देणारे वर्ग सुरू केले आहेत(How to make a video on TickTock and Instagram? Special training is given in this University).

    न्यूयॉर्क : टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर व्हीडिओ बनवणाऱ्यांची संख्या देशभरामध्ये तसेच जगभरात कमी नाही. काहीजण यामधून चांगली कमाई करतात. मात्र असे करणाऱ्या अनेकांकडे योग्य प्रकारचे प्रशिक्षण नसते. याच गोष्टीची दखल घेऊन अमेरिकेतील एका विद्यापीठाने अधिकृतपणे ऑनलाइन व्हीडिओ बनवण्यासाठीचे आणि त्या माध्यमातून पैसे कमविण्याचे कौशल्य शिकविणारे शिक्षण देणारे वर्ग सुरू केले आहेत(How to make a video on TickTock and Instagram? Special training is given in this University).

    अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलॅनामधील डरहममधील ड्यूक विद्यापिठाने आपल्या कॅम्पसमध्ये हा नवीन अभ्यासक्रम सुरू केला. बिल्डिंग ग्लोबल ऑडियन्सेस असे या अभ्यासक्रमाचे नाव आहे. मात्र सामान्य भाषेत या अभ्यासक्रमाचे नाव द टिकटॉक क्लास असे ठेवण्यात आले आहे. हा अभ्यासक्रम पदवीचा अभ्यास पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी असल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर आपला वावर वाढवण्यासाठी या वर्गात प्रशिक्षण दिले जाणार आहे.

    हा अभ्यासक्रमड्युक्स इनोव्हेशन अॅण्ड ऑन्ट्रप्रेनिअरशीप इन्स्टीट्यूटमधील प्राध्यापक अॅरोन डिनिन शिकवतात. ते सोशल मार्केटींगचे तज्ज्ञ आहेत. त्यांना विद्यार्थ्यांमध्ये असणारी रुची लक्षात घेत हा अभ्यासक्रम तयार केला. या अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यी टिकटॉकवरील ट्रेण्डशीसंदर्भात व्हीडिओ तयार करतात आणि अंतिम प्रोजेक्ट म्हणून तो आपल्या वर्गातील सहकाऱ्यांसोबत शेअर करतात. हा कंटेट कसा योग्य पद्धतीने तयार करता येईल हे या विद्यार्थ्यांना शिकवले जाते. त्यामुळेच कोणत्या पोस्ट चांगल्या चालतील आणि कोणत्या वाईट हे समजू शकते. विद्यार्थ्यांना खासगी ब्रॅण्ड निर्माण करण्यासाठीही मदत केली जाते.

    आतापर्यंत या अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी टिकटॉकवर 1 लाख 45 हजारांहून अधिक फॉलोअर्स मिळवले आहेत तर या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या व्हीडिओंना 80 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळालेत. नतालिया हॉजर नावाच्या एका विद्यार्थिनीने एका सेमिस्टरमध्ये 12 हजार फॉलोअर्स मिळवले आहेत. तिला सध्या 2 लाख 27 हजार फॉलोअर्स आहेत. ती यावरून महिन्याला 77 हजारांपासून ते 5 लाखांपर्यंत कमाई करते. तिला अनेक ब्रॅण्ड्सकडून पोस्टसाठी पैसे दिले जातात. कंपन्यांसोबत व्यवहार कसा करावा हे सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवले जाते.