Recruitment of candidates applying from SEBC from open group; GR of Home Department to recruit police without reservation

काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी १५ हजार जागांची तातडीने भरती केली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याचाच एक भाग म्हणून येत्या जुलै आणि ऑगस्टमध्ये ७ हजार २३१ पदांची पोलीस भरती करण्यात येणार आहे. मात्र त्यावेळी उमेदवारांची प्रथम लेखी नाही तर मैदानी चाचणी घेण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे(Important news for those preparing for police recruitment).

    मुंबई : काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी १५ हजार जागांची तातडीने भरती केली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याचाच एक भाग म्हणून येत्या जुलै आणि ऑगस्टमध्ये ७ हजार २३१ पदांची पोलीस भरती करण्यात येणार आहे. मात्र त्यावेळी उमेदवारांची प्रथम लेखी नाही तर मैदानी चाचणी घेण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे(Important news for those preparing for police recruitment).

    दरम्यान त्यात गोळाफेक, पुलअप्स, लांबउडी आणि १०० मीटर धावणे अशा चाचण्या घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

    शहरातील तरुणांसाठी भरती प्रक्रिया राबवताना हा निकष पूर्वीपासून होता. मात्र मध्यंतरी ग्रामीण भागातील तरुणांना पोलीस सेवेत संधी मिळावी म्हणून बंद करत आता लेखी चाचणीचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या २ वर्षांत कोरोना काळात नवीन पदांची भरतीच झालेली नाही. तर २०१९ मध्ये जाहीर झालेली पाच हजार पदांची भरती प्रक्रिया रडतखडत दीड वर्षे चालली होती. आता नवीन १५ हजार पदांची भरती होत असली तरी २०२० मध्ये घोषित झालेल्या भरतीच अद्याप मार्ग मोकळा झालेला नाही.

    भरीस भर म्हणून गृह विभागाकडून काही महिन्यांपूर्वी पोलीस नाईक पद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने भरती प्रक्रियेतील बिंदुनामावली पुन्हा बदलावी लागली आहे. तर दुसरीकडे पोलीस नाईक म्हणून कार्यरत असलेल्यांना थेट हवालदारपदी नियुक्ती करताना त्या प्रमाणात जागा रिक्त नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अजून अनेकांना त्याच पदावर काम करावे लागत आहे. यामुळे पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती. मात्र आता त्या बाबींची पूर्तता झाल्याने पुढील महिन्यात भरती प्रक्रियेला सुरवात होणार असल्याची माहिती देण्यात येत आहे.

    दरम्यान, या भरतीच्या वेळी लेखीऐवजी मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय जाहीर केला जाईल अशी शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सध्या मुंबईसह राज्यभरात पोलिसांची जवळपास २ लाख २८ हजार इतकी संख्या आहे. मात्र तरीही सुमारे ५० हजार पदे रिक्त असल्याचे सांगितले जात आहे. आताच्या भरतीत पहिल्या टप्प्यात २०२० मधील ७ हजार २३१ पदांची भरती करून नंतरच्या टप्प्यात २०२१ व २०२२ मधील रिक्तपदांची एकत्रित भरती होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.