म्हाडा परीक्षेसंदर्भातली महत्वाची बातमी ; फेब्रुवारी महिन्यात होणार ऑनलाईन परीक्षा

म्हाडा भरती परीक्षा घेण्यासाठी टीसीएसची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. या पूर्वी भरती प्रक्रियेत गैरव्यवहार करणाऱ्या जी.एस कंपनीचा करार रद्द करण्यात आला आहे. म्हाडातील १४ पदांसाठीच्या ५६५ रिक्त जागांसाठी परीक्षा होणार आहे.

    मुंबई : पेपरफुटी प्रकरणामुळे ऐन आदल्या दिवशी पुढे ढकललेल्या म्हाडा परीक्षा आता फेब्रुवारी महिन्यात होणार असून ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. म्हाडा भरती परीक्षा १ ते १० फेब्रुवारीदरम्यान होणार आहे.

    म्हाडा भरती परीक्षा घेण्यासाठी टीसीएसची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. या पूर्वी भरती प्रक्रियेत गैरव्यवहार करणाऱ्या जी.एस कंपनीचा करार रद्द करण्यात आला आहे. म्हाडातील १४ पदांसाठीच्या ५६५ रिक्त जागांसाठी परीक्षा होणार आहे. म्हाडाच्या नोकरभरतीची परीक्षा आता ऑनलाइन होणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी आणि परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी म्हाडाने हा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होणार आहे.

    यापूर्वी, गृहनिर्माण प्राधिकरण परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुण्यातील तिघांना अटक केल्यानंतर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) विविध पदांसाठी होणारी भरती परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.