Amazon India ने जाहीर केले आहे की, त्यांनी फेस्टिव्ह सीझनआधी आपल्या ऑपरेशन नेटवर्कमध्ये 1,10,000 हंगामी नोकरीच्या संधी (seasonal job Opportunity in Amazon India) निर्माण केल्या आहेत. अॅमेझॉन इंडियाच्या मते, या संधींमध्ये मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ आणि चेन्नई सारख्या शहरांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्यांचा समावेश आहे.
मुंबई : कोरोना काळात अनेकांना आपल्या नोकरीवर तुळशीपत्र ठेवावे लागले आहे (Job Loss during Coronavirus Pandemic). अशांसाठी दिग्गज E-Commerce कंपनी असणाऱ्या Amazon ने सुवर्णसंधी देऊ केली आहे. अॅमेझॉन इंडिया (Jobs in Amazon India) फेस्टिव्ह सीझन आधी बंपर नोकऱ्या देणार आहे. ॲमेझॉन भारतात 110,000 लोकांना (110,000 New jobs in E-Commerce Company Amazon India) नोकऱ्या देण्याची तयारी करत आहे. याअंतर्गत देशातील एकूण 35 शहरांमध्ये कॉर्पोरेट, टेक्नॉलॉजी, ग्राहक सेवा आणि ऑपरेशन्स क्षेत्रात (Get jobs in Corporate, Technology, Customer Care and Operations) भरती होईल.
Amazon India ने जाहीर केले आहे की, त्यांनी फेस्टिव्ह सीझनआधी आपल्या ऑपरेशन नेटवर्कमध्ये 1,10,000 हंगामी नोकरीच्या संधी (seasonal job Opportunity in Amazon India) निर्माण केल्या आहेत. अॅमेझॉन इंडियाच्या मते, या संधींमध्ये मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ आणि चेन्नई सारख्या शहरांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्यांचा समावेश आहे.
या नवीन नोकऱ्या अॅमेझॉनने नुकत्याच जाहीर केलेल्या 8,000 नोकऱ्यांव्यतिरिक्त आहेत. कंपनीने अलीकडेच सांगितले होते की, या वर्षी 8000 पदांची भरती केली जाणार आहे. 8000 पदांसाठी उमेदवारांची थेट भरती होईल. या 8000 नोकऱ्यांव्यतिरिक्त या ई-कॉमर्समधील दिग्गज कंपनीने 2025 पर्यंत देशभरात 10 लाख नवीन रोजगार निर्माण करण्याची वचनबद्धता जाहीर केली आहे.
अॅमेझॉनने जाहीर केलेल्या या नोकरीच्या उपलब्धतेमुळे अनेकांना संधी मिळणार आहे. Amazon मध्ये नोकरी मिळवणारे बहुतेक नवीन कर्मचारी अॅमेझॉनच्या सध्याच्या असोसिएट्सच्या नेटवर्कमध्ये सामील होतात. यामध्ये सुरक्षितपणे तसंच कार्यक्षमतेने ग्राहकांच्या ऑर्डर घेणे, पॅक करणे, त्याचप्रमाणे त्या ऑर्डर पाठवणे आणि वितरित करण्याचे काम समाविष्ट आहे. नवीन नोकऱ्यांमध्ये ग्राहक सेवा सहयोगींचाही समावेश आहे, त्यापैकी काही व्हर्च्युअल ग्राहक सेवा मॉडेलचा भाग आहेत जे आरामात घरी बसून देखील काम करू शकतात.