
फोटो सौजन्य- सोशल मीडिया
National Postgraduate Scholarship (NSPG): उच्च शिक्षण घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या कुमकुवत वर्गातील विद्यर्थ्यांसाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय पदव्युत्तर शिष्यवृत्ती योजना(NSPG) जाहीर केली आहे, या स्कॉलरशिप अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन(PG) म्हणजेच पदव्युत्तर शिक्षणादरम्यान दरमहा १५,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
सरकारच्या या शिष्यवृत्तीचा फायदा हुशार पण आर्थिक टंचाईमुळे शिक्षण सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना होईल यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळून त्यांचे शिक्षण अर्धवट सुटणार नाही.
या स्कॉरशिपअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रतिमहा १५,००० रुपये दिले जातात. ही रक्कम वर्षातील १० महिन्यांसाठी दिली जाते. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाच्या कालवधीत जास्तीत जास्त दोन वर्षापर्यंत या योजनेचा लाभ घेऊ शकतात. अशा प्रकारे दोन वर्षात एकूण ३ लाख रूपयांची आर्थिक मदत मिळू शकते.
या शिष्यवृत्तीचा लाभ केवळ पदव्युत्तर(Postgraduate) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळेल यासाठी मान्यताप्राप्त संस्थेत किंवा विद्यापीठात पूर्णवेळ(Full-Time) पीजी कोर्सेमध्ये प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे. याशिवाय अर्ज करताना अर्जदाराचे वय ३० वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक ६ उत्पन्न लाखापेक्षा जास्त नसावे.
राष्ट्रीय पदव्युत्तर शिष्यवृत्ती योजनेतील निवड अखिल अखिल भारतीय गुणवत्ता यादीच्या (All India Merit) आधारावर केली जाईल. म्हणजेच देशभरातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी आणि ठरवून मानकांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.याच मेरिट लिस्टनुसार पात्र उमेदवारांची निवड केली जाईल.त्यामुळे उत्तम शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांची निवड होण्याची शक्यता अधिक असते.