नियोक्त्यांच्या मागणीपेक्षा नवोदित उमेदवारांची संख्या अधिक : इंडीड

इंडीडकडील माहितीतून असे लक्षात येते की नियोक्त्यांनी वर्षअखेरीला कर्मचारी बळाचे एकत्रिकरण केल्याने आणि नववर्षाच्या योजनांमुळे त्यांच्याकडून फ्रेशर्सची मागणी कमी झाली असली तरी लसीकरण मोहिमेला आलेला वेग पाहता महामारीच्या हाताळणीच्या दृष्टीने अधिक सुसज्ज झालेल्या भारतात पुढच्या वर्षी हे आकडे वाढतील अशी अपेक्षा आहे.

    नवी दिल्ली : जगातील #1 जॉब वेबसाइट असलेल्या इंडीडने नवोदित उमेदवारांसाठी (फ्रेशर्स) नोकऱ्यांची बाजारपेठ कशी आहे यासंदर्भातील माहितीचे विश्लेषण करून त्याचे निष्कर्ष जाहीर केले. या माहितीतून असे सूचित होते आहे की नोकऱ्या शोधणाऱ्या नवोदित उमेदवारांची संख्या ऑक्टोबर २०२० च्या तुलनेत ऑक्टोबर २०२१ मध्ये ३०% वाढली आहे. मात्र त्याचवेळी नोकरी देणाऱ्यांकडील मागणी (नोकऱ्यांची संख्या) याच कालखंडात १८%नी कमी झाली आहे, असेही या माहितीतून स्पष्ट झाले असून त्यामुळे नोकऱ्यांच्या बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत गुणवत्तेचा पुरवठा वाढला आहे, असे दिसून येते.

    इंडीडकडील माहितीतून असे लक्षात येते की नियोक्त्यांनी वर्षअखेरीला कर्मचारी बळाचे एकत्रिकरण केल्याने आणि नववर्षाच्या योजनांमुळे त्यांच्याकडून फ्रेशर्सची मागणी कमी झाली असली तरी लसीकरण मोहिमेला आलेला वेग पाहता महामारीच्या हाताळणीच्या दृष्टीने अधिक सुसज्ज झालेल्या भारतात पुढच्या वर्षी हे आकडे वाढतील अशी अपेक्षा आहे. जानेवारी २०२१ मध्येही अशाच प्रकारची परिस्थिती जुळून आली होती, तेव्हा पहिल्या लाटेनंतर कोविडविषयक निर्बंध हटवण्यात आल्याने अर्थव्यवस्था पुन्हा खुली झाल्यावर नवोदित उमेदवारांच्या नोकऱ्यांमध्ये ३४% वाढ झाली होती.

    या माहितीतून असे सूचित होते की, आयटी क्षेत्रात नवोदितांना अजूनही मागणी असली तरी आयटीव्यतिरिक्तच्या क्षेत्रांतील आणि अल्पकौशल्याधारित (ब्लू कॉलर) नोकऱ्यांची संख्या आयटीच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे. वाढलेल्या नोकऱ्यांमध्ये डिलिव्हरी कर्मचारी, शॉप फ्लोअर असिस्टंट, टेक्निशियन, मेकॅनिक या पदांच्या आणि त्याचबरोबर मार्केटिंग, सेल्स आणि ॲडमिन या विभागांतील नोकऱ्यांचा समावेश आहे. ऑक्टोबर २०२० ते ऑक्टोबर २०२१ या काळात ज्यांच्या नोकऱ्या वाढल्या अशा टॉप १० पदांची वर्गवारी पुढीलप्रमाणे :

    पदनाम % फ्रेशर नोकऱ्या
    कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंन्टिटिव्ह ७%
    सेल्स एक्झिक्युटिव्ह ३%
    बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह ३%
    नवे पदवीधर ३%
    टेलिमार्केटर ३%
    कॉलर ३%
    सेल्स रिप्रेझेंटिटिव्ह २%
    मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह २%
    बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह २%
    डेव्हलपर २%

    एकीकडे तंत्रज्ञानाधारित नसलेल्या नोकऱ्यांची संख्या तंत्रज्ञानाधारित नोकऱ्यांपेक्षा वाढलेली असली तरी इंडीडच्या विश्लेषणातून असे दिसून येते की पगारांच्या बाबतीत तांत्रिक क्षेत्रातील नोकऱ्याच वरचढ आहेत. सर्वाधिक पगार देणाऱ्या फ्रेशर्सच्या नोकऱ्या पुढीलप्रमाणे :

    पदनाम
    सॉफ्टवेअर आर्किटेक्ट
    सिनियर जावा डेव्हलपर
    प्रॉडक्ट मॅनेजर
    टेक्निकल लीड
    सीनियर डेव्हलपर
    कॅटेगरी मॅनेजर
    डेव्हलपमेंट ऑपरेशन्स इंजीनियर
    बॅक एंड डेव्हलपर
    प्रोजेक्ट मॅनेजर

    “देशाची अर्थव्यवस्था कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेतून सावरून वेग घेत असताना आणि आयटी व तंत्रज्ञान क्षेत्रात जोरदार वाढीचे वातावरण असताना आश्चर्याची गोष्ट म्हणजे आयटी/आयटीईएस क्षेत्रामध्ये पदे अपेक्षेपेक्षा कमी वेगाने भरली जात आहेत. दुसऱ्या बाजूला डिलिव्हरी बॉइज, शॉप फ्लोअर असिस्टंट्स, सेल्स पर्सोनेल, मेकॅनिक्स आणि टेक्निशियन्स यांच्यासारख्या ब्लू कॉलर नोकऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसते आहे. ई-कॉमर्स, एफएमसीजी, हेल्थकेअर आणि होम सर्व्हिसेस यांच्यासारख्या क्षेत्रांना लसीकरण मोहिमांमुळे बळ मिळाले असून तिथे कर्मचारीसंख्या वाढते आहे.

    दुसऱ्या लाटेतून सावरणाऱ्या उद्योग-व्यवसायांनी आक्रमक रीतीने ग्राहक खेचून घेण्याची चढाओढ चालवल्याचा हा परिणाम असू शकतो.”

    – सशी कुमार, विक्री विभाग प्रमुख, इंडीड इंडिया.