ऑगस्ट महिन्यात ‘अल्टो’ची जबरदस्त मागणी

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये वाहनांची विक्री १७.१ टक्क्यांनी वाढून १,२४,६२४ वाहनांवर पोहोचली आहे. तर मारुतीच्या मिनी कार अल्टो आणि वॅगन आरची विक्री ९४.७ टक्क्यांनी वाढून १९,७०९ वाहनांवर पोहोचली आहे.

कोरोनाच्या काळात अनेक व्यापार आणि उद्योगधंदे बंद करण्यात आले होते. त्यामुळे बऱ्याच कंपनींना आर्थिक नुकसान झालं होतं. परंतु अनलॉकच्या कालावधीत कंपनीच्या मिनी कार ‘अल्टो’ (ALTO)आणि ‘वॅगन आर’ (WAGON R) च्या विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये वाहनांची विक्री १७.१ टक्क्यांनी वाढून १,२४,६२४ वाहनांवर पोहोचली आहे. तर मारुतीच्या मिनी कार अल्टो आणि वॅगन आरची विक्री ९४.७ टक्क्यांनी वाढून १९,७०९ वाहनांवर पोहोचली आहे.

कॉम्पॅक्ट प्रकारात SWIFT, CELERIO , IGNIS, BALENO आणि DZIRE यांची विक्री १४२ टक्क्यांनी वाढून ६१,९५६ वाहनांवर गेली. त्यामुळे अनलॉक कालावधी दरम्यान मारुती सुझुकीची कार विक्री पुन्हा एकदा रुळावर येताना दिसत आहे.