अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी कारमध्ये नवीन टेक्नॉलाजी देणे बंधनकारक

रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने जुलै महिन्यात एक नियमावली जाहीर केली आहे. यात गाड्यांमध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) कारमध्ये असणे गरजेचं असल्याचे स्पष्ट केले आहे. नव्या नियमावलीनुसार, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), स्पीड अलर्ट, ग्लेजिंग ग्लास, रिव्हर्स पार्किंग सिस्टम सारखे फिचर्सही आता कारमध्ये असणे बंधनकारक असणार आहे.

नवी दिल्ली: येत्या ऑक्टोंबर (October) महिन्यापासून कारमध्ये नवीन टेक्नॉलाजी ( New technology in the car) देणे बंधनकारक असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) सह इतर उपकरणांचा समावेश आहे. महामार्गावर होत असलेल्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारच्या (Central Government)  प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे वाहन नियमावलीमध्ये बदल केले जात आहे.

रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने जुलै महिन्यात एक नियमावली जाहीर केली आहे. यात गाड्यांमध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) कारमध्ये असणे गरजेचं असल्याचे स्पष्ट केले आहे. नव्या नियमावलीनुसार, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), स्पीड अलर्ट, ग्लेजिंग ग्लास, रिव्हर्स पार्किंग सिस्टम सारखे फिचर्सही आता कारमध्ये असणे बंधनकारक असणार आहे.

रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने नवीन नियमावलीसाठी सूचना मागवल्या होत्या. त्यानुसार, आता ऑक्टोबर महिन्यात नवीन यंत्रणा लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही नवीन यंत्रणा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. गाडीत रिव्हर्स पार्किंग सिस्टिम लावणे आता बंधनकारक करण्यात येणार आहे. जेव्हा गाडी मागे घ्यायची असेल तेव्हा चालकाना मागील बाजूबद्दल माहिती मिळेल. त्यामुळे वाहन मागे घेण्यास सोईचे होईल.