कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे टोयोटा किर्लोस्कर कारच्या विक्रीत ‘इतक्या’ टक्क्यांची घट

नवी दिल्ली – टोयोटा किर्लोस्कर मोटरची घरगुती विक्री जूनमध्ये ६३.५३ टक्क्यांनी घसरून ३,८६६ वाहनांची नोंद झाली. गेल्या वर्षी जूनमध्ये कंपनीची विक्री १०६०३ इतकी होती. या वर्षाच्या मेमध्ये कंपनीने १६३९ वाहने विकली. 

कंपनीने बुधवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जून २०२० मध्ये त्याची निर्यात झाली नाही. जून २०१९ मध्ये ८०४ ईटिओ कारची निर्यात केली. टोयोटा किर्लोस्करचे वरिष्ठ उपाध्यक्ष  नवीन सोनी म्हणाले की, बाजारपेठेतील मागणी हळू हळू सुधारत आहे.

कोरोना विषाणूच्या संकटामुळे मे महिन्यात देशभरात लॉकडाऊन होता, ज्यामुळे ऑटो कंपन्यांची विक्री कमी झाली. ८ जूननंतर देशातील आर्थिक क्रिया हळूहळू पुन्हा सुरू झाल्या आहेत, ज्यायोगे कंपन्यांची विक्री सुधारली आहे.