ही इलेक्ट्रिक कार चालवण्यासाठी चार्जिंगची गरज नाही; सर्व गाड्या २४ तासात सोल्ड आउट

अमेरिकेतील इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप कंपनीने तीन चाकांची कार लाँच केली आहे. ही गाडी चालवण्यासाठी कोणत्याही चार्जिंगची गरज नाही. Aptera Motors नावाच्या या स्टार्टअपने पहिली सोलर इलेक्ट्रिक (sEV) गाडी लाँच केली आहे.

कोरोनाच्या काळात मंदावलेले वाहन उद्योग आणि वाहन खरेदी यानां अनलॉक नंतर गती मिळाली आहे.  पेट्रोल-डिझेलशिवाय आता कार कंपन्या आपला फोकस इलेक्ट्रिक कारकडे वळवत आहेत. पण इलेक्ट्रिक कार चार्ज करण्याची मोठी चिंता आहे. मात्र ही चिंताही अमेरिकेतील एका कार कंपनीने दूर केली आहे.

अमेरिकेतील इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप कंपनीने तीन चाकांची कार लाँच केली आहे. ही गाडी चालवण्यासाठी कोणत्याही चार्जिंगची गरज नाही. Aptera Motors नावाच्या या स्टार्टअपने पहिली सोलर इलेक्ट्रिक (sEV) गाडी लाँच केली आहे. जी दररोज चार्ज करण्याची आवश्यकता नाही. ही कार सोलर पॉवरवर चार्ज होते. एकदा चार्ज केल्यानंतर कार १६०० किलोमीटरपर्यंत चालण्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. हे अंतर कोणत्याही इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत अधिक असून टेस्ला कारही यात मागे आहे.

या स्टार्टअपचे सह-संस्थापक क्रिस एंथनी यांनी सांगितलं की, ‘या टेक्नोलॉजीसाठी सूर्याच्या उर्जेची पावर मिळेल. कारमधील बिल्ट इन सिस्टम आपलं चार्जिंग नेहमी मेंटेन ठेवतं. हा चार्जिंग स्पीड जवळपास ५०० मैल ताशी स्पीडने चार्ज होईल.’

Aptera कारमध्ये नेवर चार्ज टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. जो सूर्याची उर्जा प्राप्त करतो. या कारमध्ये लावण्यात आलेल्या बॅटरीची क्षमता २५.० kWh ते १००.० kWh आहे. सर्वात हेवी मॉडेलचं वजन ९९७ किलोग्रॅम आहे. ही इलेक्ट्रिक कार वेगवेगळ्या मॉडेलमध्ये १३४ bhp ते २०१ bhp पर्यंत पॉवर जनरेट करू शकते. कार केवळ ३.५ सेकंदमध्ये शून्य ते ६० किलोमीटर ताशी स्पीड पकडते. या कारचा सर्वाधिक स्पीड १७७ किलोमीटर ताशी असू शकतो. Aptera ने नुकतंच आपल्या Solar Powered Electric Vehicle चा प्री-ऑर्डर सेल सुरू केला होता. केवळ २४ तासाहून कमी वेळेत सर्व कार सोल्ड आउट झाल्या होत्या.