टोयोटाने लाँच केले एसयूव्ही फॉर्च्यूनरचे स्पेशल एडिशन…

  • स्पेशल एडिशन मॉडेलमध्ये टीआरडी बॅजिंग आणि रग्ड चारकोल ब्लॅक आर १८ एलॉय व्हिल्ज देण्यात आले आहेत. तसेच ड्युअल टोन रुफ आणि पर्ल व्हाईट ड्यूअल टोन कलर स्कीम एसयूव्हीला अधिक चांगला लूक देते. फॉर्च्यूनर टीआरडीला डिझेल इंजिन आणि दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. तसेच या व्हेरिएंटची किंमत ३४.९८ लाख आणि ३६.८८ लाख रुपये आहे.

टोयोटा कंपनीने भारतीय बाजारात एसयूव्ही फॉर्च्यूनरचे नवीन एडिशन लाँच केले आहे. यामध्ये कंपनीच्या डिलरशीपकडे या स्पेशल आणि नवीन एडिशनच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे. स्पेशल एडिशन मॉडेलमध्ये टीआरडी बॅजिंग आणि रग्ड चारकोल ब्लॅक आर १८  एलॉय व्हिल्ज देण्यात आले आहेत.  तसेच ड्युअल टोन रुफ आणि पर्ल व्हाईट ड्यूअल टोन कलर स्कीम एसयूव्हीला अधिक चांगला लूक देते. फॉर्च्यूनर टीआरडीला डिझेल इंजिन आणि दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. तसेच या व्हेरिएंटची किंमत ३४.९८ लाख आणि ३६.८८ लाख रुपये आहे.   

फॉर्च्यूनरमध्ये एलईडी डीआरएलसोबत बाय-बिम एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी फॉग लॅम्प्स, रिअर कॉम्बिनेशन लॅम्प्स, क्रोम प्लेटेड डोर हँडल्स आणि विंडो बेल्टलाइन देण्यात आली आहे. सर्वसाधारण मॉडेलपेक्षा यात अधिक फीचर्स देण्यात आले आहे. फॉर्च्यूनरच्या इतर मॉडेलच्या तुलनेत टीआरडी एडिशन लूकला अधिक स्पोर्टी दिसत आहे.

फॉर्च्यूनर टीआरडी एडिशनमध्ये २.८ – लीटर, ४ -सिलेंडर डिझल इंजिन दिले आहे. तसेच हे इंजिन 177PS पॉवर आणि 450Nm टॉर्क जनरेट करते. याशिवाय ७ एयरबॅग्स, ब्रेक असिस्टसोबत व्हिकल स्टॅबिलिटी कंट्रोल, दूसरी रांगेत Isofix आणि टीथर अँकर, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल, अशा अनेक प्रकारचे फीचर्स या कारमध्ये उपलब्ध आहेत.