केंद्रीय मंत्र्यांकडून १० जंबो ऑक्सिजन Cylender भेट

ब्रह्मपुरी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्हेंटिलेटर व ऑक्सिजन सहीत आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी प्रा. अतुल देशकर यांनी केंद्रीय मंत्री भाजपा नेते नितीन गडकरी यांना ब्रह्मपुरी येथे 10 जंबो ऑक्सिजन सिलिंडर देण्याची विनंती केली होती.

    कोलारी (Kolari).  ब्रह्मपुरी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्हेंटिलेटर व ऑक्सिजन सहीत आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी प्रा. अतुल देशकर यांनी केंद्रीय मंत्री भाजपा नेते नितीन गडकरी यांना ब्रह्मपुरी येथे 10 जंबो ऑक्सिजन सिलिंडर देण्याची विनंती केली होती. त्याअनुषंगाने गडकरी यांनी ब्रह्मपुरी तालुक्यासाठी 10 जंबो ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून दिल्याने कोविड परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मोलाची मदत होणार आहे.

    27 एप्रिल रोजी माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 4 जंबो ऑक्सिजन सिलिंडर वैद्यकीय अधीक्षक डॉ. खिल्लारे, डॉ. मेंढे, डॉ. क्रिष्णा यांना कोविड केअर सेंटरसाठी सुपुर्द करण्यात आले. तर ख्रिस्तानंद कोविड रुग्णालयासाठी फादर जोसेफ, डॉ.संग्रामे, डॉ. ठिकरे, डॉ. बनकर यांना 3, IMA हॉल कोविड सेंटरसाठी डॉ. मेश्राम यांना 1, आस्था कोविड रुग्णालयासाठी डॉ. जयस्वाल यांना 1 व सर्वोदय कोविड सेंटरसाठी डॉ. पर्वते, डॉ. लंजे यांना 1 जंबो ऑक्सिजन सिलिंडर सुपूर्द करण्यात आले.

    यावेळी तहसीलदार. विजय पवार साहेब, भाजपा ओबीसी आघाडी प्रदेश कार्य. सदस्य प्रा.प्रकाश बगमारे, जिल्हा महामंत्री क्रिष्णा सहारे, नगरसेवक मनोज वठे, अरविंद नंदूरकर, साकेत भानारकर, तनय देशकर स्वप्नील अलगदेवें, ललीत उरकुडे, अरुण भगत, किशोर गराडे आदीं उपस्थित होते. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. खिल्लारे, फादर जोसेफ, डॉ. जयस्वाल, डॉ. पर्वते, डॉ. मेश्राम यांनी देखील गडकरी व माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांचे आभार मानले.