ब्रम्हपुरी पोलिसांकडून अटक करण्यात आलेले आरोपी दारूतस्कर आणि जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
ब्रम्हपुरी पोलिसांकडून अटक करण्यात आलेले आरोपी दारूतस्कर आणि जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

  • ४ मद्यतस्करांना अटक

ब्रम्हपुरी (Brahmapuri ):  चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगांव नागमंदिर टी-पाॅईंट परिसरात पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान देशी दारूसह २.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त केली आहे. या मार्गे चार तस्कर देशी दारू घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. याच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि ४ मद्यतस्करांना अटक केली. आरोपींमध्ये मंगलदास पिसे (२१), अनिल मुजारिया (२३), कृष्णा करंबे आणि रूपेश वैद्य यांचा समावेश आहे.

प्रकरणातील तिन्ही आरोपी एका बाईकवरून देशी दारू घेऊन जात होते. गुप्त सूचनेच्या आधारावर ठाणेदार बाळासाहेब हाके यांनी गुन्हे शाखेचे मुकेश, योगेश, अजय नागोसे, अजय कताईत यांसह तोरगाव नागमंदिर टी-पाॅईंटजवळ नाकाबंदी लावली. दरम्यान एका मोटरसायकलवर ५ पेटी आणि दुसऱ्या मोटरसायकलवर ३ पेटी घेऊन जाताना ४ मद्यतस्कर आढळून आले. पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांची तपासणी केली असता त्यांना आरोपी तस्करांकडे दारूचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी आरोपींकडून ५० हजार रुपयांच्या ५ पेट्या, ४०६०० रुपयांच्या ३ पेट्या देशी दारू यासह २.०५ लाखांच्या मोटरसायकल असा एकूण २.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.