चंद्रपुरात वाघाच्या संशयास्पद हल्ल्यात २ व्यक्ती ठार

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या संशयित हल्ल्यात एका कुटुंबातील दोन जण ठार झाल्याची माहिती वनअधिकाऱ्याने दिली. चंद्रपूर सर्कलचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी सांगितले ....

    चंद्रपूर (Chandrapur).  महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या संशयित हल्ल्यात एका कुटुंबातील दोन जण ठार झाल्याची माहिती वनअधिकाऱ्याने दिली. चंद्रपूर सर्कलचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी सांगितले की, पवनपर गावात राहणारे दोन लोक मंगळवारी पहाटे ब्रम्हपुरी विभागांतर्गत सिंदेवाही वन रेंजमध्ये मोहाची फुले गोळा करण्यासाठी गेले होते. या दरम्यान वाघाने त्यांच्यावर हल्ला केला.

    सुरुवातीला एका वाघाने त्यातील एकास ठार मारले आणि जेव्हा त्याच्या नातेवाईकाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा वाघाने त्यालाही ठार मारले, अशी माहिती वन अधिकाऱ्याने दिली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पापासून जिल्ह्यात सुमारे 45 45 कि.मी. अंतरावर ही घटना घडली आहे. मृृतकांची नावे कमलाकर रिषी उंडिरवाडे (6०) आणि दुर्वास धनुजी उंडिरवाडे (48) आहेत. त्यांचे मृतदेह वनक्षेत्रात २०० मीटर अंतरावर सापडल्याची माहिती मिळाली.

    वनविभागाने आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर मृताच्या नातलगांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. या घटनेमुळे पवनपर गावातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.