जातपंचायतीने बहिष्कृत केल्याने मृत वडिलांच्या पार्थिवाला ७ बहिणींनी दिला खांदा

गोंधळी समाजाच्या प्रकाश ओगले यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना समाजातील समारंभ, लग्न, कार्यक्रम त्यांना जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे जात पंचायतीने त्यांच्यावर बहिष्कार टाकला. एवढेच नव्हे तर त्यांच्यावर आर्थिक दंडही लावण्यात आला. मात्र प्रकाश ओगले यांनी दंड भरला नाही. त्यामुळे हा बहिष्कार त्यांच्या मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतर ही कायम राहिला.

    चंद्रपूर: समाजातील समारंभ, लग्न, कार्यक्रमाला येत-जात नसल्याने गोंधळी समाजातील जात पंचायतीने ५८ वर्षीय प्रकाश ओगले यांना वाळीत टाकले होते. इतकेच नव्हे तर प्रकाश ओगले यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवास खांदा देण्यासही जात पंचायतीने नकार दिल्याने अखेर ७ बहिणींनी वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    बहिष्कृत कुटुंबाच्या मदतीसाठी समाजातील इतर कोणी गेल्यास तसेच पार्थिवाला खांदा देईल त्यांनाही जातीतून बहिष्कृत करण्यात येईल अशी धमकी जात पंचायतीने दिल्यामुळे समाजातील कोणतीही व्यक्ती मदती साठी पुढे आलेली नाही .

    स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहीतीनुसार,गोंधळी समाजाच्या प्रकाश ओगले यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना समाजातील समारंभ, लग्न, कार्यक्रम त्यांना जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे जात पंचायतीने त्यांच्यावर बहिष्कार टाकला. एवढेच नव्हे तर त्यांच्यावर आर्थिक दंडही लावण्यात आला. मात्र प्रकाश ओगले यांनी दंड भरला नाही. त्यामुळे हा बहिष्कार त्यांच्या मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतर ही कायम राहिला.

    या घटनेचे वृत्त कळताच भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी खेद व्यक्त करत,’आजच्या काळात एखाद्या कुटुंबावर बहिष्कार टाकल्या जात असेल तर ती चिंतेची बाब आहे, योग्य ती चौकशी करून दोषींना शिक्षा झाली पाहिजे.’ असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.