नाल्यावर पाणी प्यायला आलेल्या वाघाने व्यक्तीवर हल्ला करून ठार मारले; ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील घटना

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये मरोडा येथील एका जणाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला (A man from Maroda died in a tiger attack). ही घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजता समोर आली. चालू वर्षात वन्यजीव हल्ल्यात ठार (The death toll from wildlife attacks) झालेल्यांची संख्या आता १९वर पोहचली आहे.

    चंद्रपूर (Chandrapur).  ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये मरोडा येथील एका जणाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला (A man from Maroda died in a tiger attack). ही घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजता समोर आली. चालू वर्षात वन्यजीव हल्ल्यात ठार (The death toll from wildlife attacks) झालेल्यांची संख्या आता १९वर पोहचली आहे.

    मनोहर अद्कुजी प्रधान (वय ६८) रोजगार हमी योजनेच्या कामावर गेलेला त्यांचा मुलगा आणि सुनेला डबा देण्यासाठी गेले होते. डबा देऊन घराकडे परत येत असताना आंबे तोडण्यासाठी ताडोब्याच्या बफर झोनमधील मूल वन परीक्षेत्राच्या मारोडा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ७७९मध्ये गेले. त्याच वेळी डोंगराला लागून असलेल्या नाल्यावर पाणी पिण्यासाठी आलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. सकाळी गेलेले मनोहर दुपारपर्यंत घरी न परतल्याने शोध घेतला असता, त्यांचा मृतदेह नाल्याजवळ आढळला. या घटनेनंतर गावकऱ्यांना जंगलात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या घटनेने चंद्रपूर जिल्ह्यात चालू वर्षात वन्यजीव हल्ल्यात ठार झालेल्यांची संख्या १९वर पोहचली आहे. यातील १६ हल्ले वाघाने, दोन बिबट्याने, तर एक हल्ला हत्तीने केला आहे.

    दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात आठवडाभरात चौघांचा वन्यजीव हल्ल्यात मृत्यू झाला. वाघाच्या हल्ल्यांमध्ये २० मे रोजी तीन जण ठार झाले होते. खबरदारी म्हणून वन विभागाने या भागातील तेंदूपत्ता संकलन थांबविले आहे.