bramhapuri liquor sized

ब्रह्मपुरी. गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने स्मशानभूमी मार्गावर नाकेबंदी करीत ४ आरोपींना १८ पेटी दारू, ३ मोटारसायकली, ४ मोबाईलसह अटक केली आहे. पोलिसांनी सोमवारी पहाटेच ही कारवाई केली.

काही जण मोटारसायकलच्या मदतीने दारूची तस्कर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्या आधारे पथकाने कारवाई करीत  ३५६३०० रुपयांचा माल जप्त केला आहे. १० बॉक्समध्ये ९० मिलीलीटर  आणि ८ बॉक्समध्ये १८० एमएल दारू जप्त केली, मोटारसायकल क्र. एमएच ३४ एजे ४००५, एमएच २९ झेड ९५५३ आणि एक बिना नंबरची मोटारसायकल, ४ मोबाईल जप्त केले एकूण ३५६३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आमिर खान (२५), कासिम शेख (२२), समीर डोंघे (वय २१) आणि जतिन मूलमुले (२०) अटक केली आहे. जिल्ह्यात दारूबंदीच्या घोषणेनंतर तस्करांची संख्या वाढली आहे.