murder in khambada chandrapur district

  • खुनातील मुख्य सुत्रधारांचा शोध सुरू

वरोरा. वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे व्यक्तिगत वादातून मृतक विष्णु बालाजी याची झालेली हत्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींना १० सप्टेंबरला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर आरोपी राजकुमार टेकाम वय २०, पिंपळगाव शिंगरू, ता.वरोरा ,राजू अनिल कटउते वय १९,रा.वाघ सावली,ता.समुद्रपूर दोघांनाही १४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे.

मृतक विष्णू बालाजी कष्टी हा खांबाडा येथील रहिवासी असून,त्याचे वय 36 होते.मृतक 7 सप्टेंबर ,रोज सोमवारला स्वतःच्या मालकीची गाडी पलयाटीना घेऊन गायब झाला होता. आणि त्याचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करीत परिवारातील लहान भावाने  ९ सप्टेंबरला सकाळी १२ वाजता पोलीस स्टेशन वरोरा येथे तक्रार दिली होती.आरोपींचा पत्ता घेण्यासाठी नातेवाईक एका आरोपीच्या पिंपळगाव  शिंगरू या गावाला गेले.

आरोपी वाघ सावलीला गेला असे घरच्यांनी सांगितले.त्यानंतर वाघ सावलीला गेले.तिथेही सुगावा आरोपींचा सुगावा लागला नाही.त्यानंतर .संशयित आरोपीच्या विरोधात काही गुन्ह्याची नोंद आहे का हे पाहण्यासाठी समुद्रपूर पोलीस स्टेशनला मृतकाचे नातेवाईक निघाले.तर आरोपी समुद्रपूर रस्त्यांनी जात असतांना त्यांच्या गाडीतील पेट्रोल संपले म्हणून ते थांबून होते.

समुद्रपूर पोलिसांना कळविले आणि आरोपींना पकडले. मृतकांचे नातेवाईकांनी वरोरा पोलीस स्टेशन भ्रमंणध्वनिवरून सूचना दिली. वरोरा पोलीस एक तासात आरोपीपर्यंत पोहचले. अटकेतील दोन आरोपींनी खांबाडा जवळील जिंनिगच्या परिसरातील झुडपात असलेला छिन्न विच्छिन्न मृतकाचा मृतदेह दाखविला. देहावर ऍसिड टाकून मृतकाची हत्या केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

मृतक विष्णू कष्टी हा खूप वर्षांपासून शंभुसेठ चौधरी यांचेकडे काम करीत होता.शंभुसेठ यांचे काम बल्यास्टिंग चे असून, पुलगाववरून बारूद आणण्याचे काम हे मृतकाकडेच होते.तसेच बारुंद आणण्याचा परवाना सुद्धा मृतकाचेच नावाने असल्याचे मृतकाचे वडिलांची माहिती आहे. दोन्ही आरोपी सुद्धा शंभुसेठ कडेच नौकर होते.परंतु,शंभूकडे चोरी झाल्याने आरोपींना कामावरून काढून टाकण्यात आले होते.परंतु,मृतक हा मध्यन्तरी चेतक कंपनीत कामाला गेला होता.त्यानंतर लाकडाऊन मुले कंपनी बंद झाली.आणि पूर्ववत शंभुसेठ कडे कामाला लागला. परंतु,दोन आरोपी,शंभुसेठ,व मृतक यांच्यात व्यक्तिगत वाद होता असे समजले. आणि या वादातूनच शंभुसेठ नी सुपारी देऊन आरोपिकरवी मृतकाची हत्या झाली असा संशय मृतकांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

संशयित शंभुलाल चौधरी मात्र फरार

शंभुलाल चौधरी हा राजस्थानमधील भिलवाडा येथील राहणारा असून,त्याने खांबाडा येथे येऊन बल्यास्टिंग व्यवसायाचे माध्यमातून खूप मोठे आर्थिक साम्राज्य निर्माण केले आहे.काही दिवसांपूर्वी शंभुलालनी मृतकाचे लहान भावाला राजस्थान ला घेऊन गेला होता, आणि त्याठिकाणी त्याला बेदम मारहाण केली असल्याची माहिती आहे.

खुनाचा खरा सूत्रधार शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न

खुनाचा खरा सूत्रधार शंभुलाल यांचेकडे मृतकाच्या नातेवाईकांची संशयाची सुई त्यांचेकडे जरी असली तरी काल डिटेल्स तपासूनच पोलीस नेमके त्या मार्गानी चौकशी करतील .आणि खरा सूत्रधार कोण,खुनामगिल रहस्य काय? याबाबत निश्चितच उलगडा होणार असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.

शव उचलण्यास ग्रामस्थांचा नकार

जोपर्यंत मुख्य सुत्रधाराला अटक करण्यात येत नाही.तोपर्यंत मृतकाचे शव आम्ही उचलू देणार नाही.असा हट्टहास ग्रामस्थांनी धरला असता,वरोरा पोलिसांनी बळाचा वापर करून सौम्य लाठीचार्ज केला.लाठीचार्जमध्ये मृतकाचे नातेवाईकांना सुद्धा लाठीचा प्रसाद मिळाला. अखेर तणाव शांत झाला.आणि पोलिसांनी शव ताब्यात घेऊन शवविच्छेदन साठी उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले.