पाच नवे हॉस्पिटल बाधितांसाठी अधिग्रहित करा; खा. धानोरकर यांची जिल्हाधिकारी, अधिष्ठाता, शल्यचिकित्सकांना सूचना

जगात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने कहर केला आहे. मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या संख्येत वाढ होत आहे. वाढत्या रुग्णाच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर देखील भार येत आहे.

    चंद्रपूर (Chandrapur).  जगात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने कहर केला आहे. मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या संख्येत वाढ होत आहे. वाढत्या रुग्णाच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर देखील भार येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आणखी चार नवे हॉस्पिटल त्यात घुग्घुस येथील राजीव रतन रुग्णालय, लालपेठ येथील वेकोलिचे रुग्णालय, सास्ती, माजरी व आयुधनिर्मणी चांदा येथील हॉस्पिटल अधिग्रहित करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी, अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिल्या.

    गिरणार चौक येथे कोरोना सहायता कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. या दरम्यान अनेकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना रुग्णालयाची होणारी गैरसोय याबाबत खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत खासदार बाळू धानोरकर यांनी तिथूनच जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अध्यक्ष तथा प्रबंधक निर्देशक वेकोलि नागपूर, महाप्रबंधक आयुधनिर्माणी चांदा, अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सक राठोड यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून ही पाच रुग्णालय ताब्यात घेऊन त्यांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा घेत तेथे कोरोना रुग्णांवर उपचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

    जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हजारो लोक बाधित होत आहे. दिवसेंदिवस रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. त्यामुळे तालुका स्तरावर कोविड रुग्णालय उभारून वेकोलिचे लालपेठ, सास्ती, माजरी, घुग्घुस येथील राजीव रतन तसेच आयुध निर्मणी चांदा ही क्षेत्रीय रुग्णालय व उद्योगातील अंबुजा, माणिकगड, अल्ट्राटेक, ए. सी. सी, बिल्ट इंडस्ट्रीज येथील तज्ज्ञ डॉक्टर व परिचारिकांची सेवा कोविड रुग्णांकरिता अनिवार्य करावे तसेच ही परिस्थिती नियंत्रणात आणण्या करता रुग्णांना उत्कृष्ठ उपचाराकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना केले.