स्थानिक गुन्हे शाखेने दहा वाळू तस्करांवर केली कारवाई; रेतीतस्करांवर गुन्हे दाखल

पोंभुर्णा तालुक्यात (In Pombhurna taluka) शनिवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेने (the local crime branch) दहा वाळू तस्करांवर (sand smugglers) कारवाई केली. याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेक रेतीघाटातून तस्करी सुरू असल्याच्या तक्रारी पोलिस विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या.

    चंद्रपूर (Chandrapur).  पोंभुर्णा तालुक्यात (In Pombhurna taluka) शनिवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेने (the local crime branch) दहा वाळू तस्करांवर (sand smugglers) कारवाई केली. याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेक रेतीघाटातून तस्करी सुरू असल्याच्या तक्रारी पोलिस विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. पोलिस अधीक्षक अरविंद साळवे (Superintendent of Police Arvind Salve) यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना अवैध रेतीतस्करांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले.

    शनिवारी रात्रीच्या सुमारास पोंभुर्णा तालुक्यातील अंधारी नदीच्या भीमणी घाटावरून अवैधरित्या रेतीतस्करी करणारे दहा ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. या सर्व तस्करांवर गुन्हे दाखल करून ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. या कारवाईने रेतीतस्कर धास्तावले आहेत. या तस्करांवर पाळत ठेवण्यासाठी पथक गठीत करण्यात आले आहे.