दारूसोबत चकना सोबत लग्नाची पत्रिका! अरे खूब जमेंगा रंग जब मिलेंगे....
दारूसोबत चकना सोबत लग्नाची पत्रिका! अरे खूब जमेंगा रंग जब मिलेंगे....

लग्नपत्रिकेवर अतिविशिष्ट व्यक्तींना सन्मानाचे निमंत्रण म्हणून अक्षता लावून पत्रिका देण्याचे चलन भारतीय संस्कृतीत आहे. पण, कुणी लग्नपत्रिकेसोबत दारुची बाटली आणि चकणा पॅकबंद डब्यात देत असेल तर अशा लग्नाला तोबा गर्दी उसळणारच; पण अशाप्रकारच्या पत्रिकेचं विदर्भातील दारुबंदी असलेल्या एका जिल्ह्यात वाटप झालं आहे. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडिओच व्हायरल झाल्याने पोलिस आणि जिल्हा प्रशासनाची झोपच उडाली आहे.

चंद्रपूर (Chandrapur).  लग्नपत्रिकेवर अतिविशिष्ट व्यक्तींना सन्मानाचे निमंत्रण म्हणून अक्षता लावून पत्रिका देण्याचे चलन भारतीय संस्कृतीत आहे. पण, कुणी लग्नपत्रिकेसोबत दारुची बाटली आणि चकणा पॅकबंद डब्यात देत असेल तर अशा लग्नाला तोबा गर्दी उसळणारच; पण अशाप्रकारच्या पत्रिकेचं विदर्भातील दारुबंदी असलेल्या एका जिल्ह्यात वाटप झालं आहे. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडिओच व्हायरल झाल्याने पोलिस आणि जिल्हा प्रशासनाची झोपच उडाली आहे.

देशाच्या काही भागात अशा पद्धतीने निमंत्रण पत्रिकांचे चलन असेलही. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात याचे वेगळे महत्त्व आहे. जिल्ह्यात दारूबंदी असली तरी ती कागदावर आहे हे सर्वश्रुत आहे; मात्र याच महिन्याच्या १५ तारखेला चंद्रपूर जिल्हास्थानी हा विवाह सोहळा संपन्न झाल्याचं निमंत्रण पत्रिकेवरून स्पष्ट होत आहे. या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेसह एका छोट्या गिफ्ट बॉक्समध्ये दारूची बाटली पाणी आणि चखणा असे गिफ्ट पाहुण्यांना पाठविले गेले. निमंत्रण पत्रिकेचा हा व्हिडिओ सध्‍या वायरल झाला आहे. एकीकडे दारूबंदीच्या निमित्ताने पोलिसांवर हल्ले होत आहेत.

कोट्यावधी रुपयांची दारू पोलीस जप्त करत आहेत. हजारो नवे आरोपी तयार होत आहेत. अशातच या दारूबंदी दरम्यान दारूलाच लग्नबंधना एवढेच पावित्र्य देण्याचा प्रयत्न यजमानांनी केलेला दिसतो. तोही सर्व कायदे धाब्यावर बसवत. चंद्रपूर पोलिसांना आता या वायरल व्हिडिओची सत्यता पडताळून पाहत कारवाई करण्याचे मोठे आव्हान आहे. या व्हिडिओने अनेक सामाजिक प्रश्न मात्र निर्माण केले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात सहा वर्षांपासून प्रशासनाने दारूबंदी लागू केली आहे. मात्र या बंदीला आव्हान देणारा हा व्हिडीओ एखाद्या बार-हॉटेलच्या उद्घाटनाचा नसून ही लग्नाची निमंत्रण पत्रिका आहे.