कुटुंबावर बहिष्कार टाकणे आले अंगलट; सहा जातपंचाना न्यायालयाने सुनावली कोठडी

गोंधळी जोशी जात पंचायतने ३० वर्षांपूर्वी समाजातील प्रकाश गणपत ओगले यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकून (family boycott case chandrapur) जातीबाहेर काढले. त्यांच्याकडील कोणत्याही कार्यक्रमात अन्य समाजबांधवांना सहभागी होण्यावर बंदी घातली.

    चंद्रपूर (Chandrapur).  गोंधळी जोशी जात पंचायतने ३० वर्षांपूर्वी समाजातील प्रकाश गणपत ओगले यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकून (family boycott case chandrapur) जातीबाहेर काढले. त्यांच्याकडील कोणत्याही कार्यक्रमात अन्य समाजबांधवांना सहभागी होण्यावर बंदी घातली. त्यामुळे प्रकाश ओगले यांच्या अंत्यसंस्कारालाही समाजातील कुणीही आले नाही.

    याप्रकरणी झालेल्या तक्रारीवरून बहिष्कार टाकण्याचा निर्देश देणाऱ्या सहा जातपंचांना अटक केली आहे. अटकेतील सहाही जणांना बुधवारी (ता. १६) न्यायालयीन कोठडी (court custody) सुनावण्यात आली. (court custody to six people in family boycott case in chandrapur)

    सुरेश शंकरराव बैराडकर (वय ७२, रा. नागपूर), सुरेश गंगाराम गंगावणे (६५, रा. यवतमाळ), मोहन सीताराम ओगले (७४, रा. यवतमाळ), कैलाश नारायणराव वैरागडकर (७०, रा. रायपूर, छत्तीसगड), प्रेम सुरेश गंगावणे (४६, रा. यवतमाळ), विनोद गणपतराव वैरागडकर (४८, रा. नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

    चंद्रपुरात गोंधळी (जोशी) समाजाचे केवळ तीनच कुटुंबे आहेत. यातील प्रकाश गणपत ओगले यांचे कुटुंब चंद्रपुरातील भिवापूर प्रभागातील भंगाराम वॉर्डात राहते. त्यांना सात मुली व दोन मुले आहेत. प्रकाश ओगले यांचे १२ जून आजाराने निधन झाले होते. मात्र, ३० वर्षांपासून कुटुंबावर बहिष्कार असल्याने समाजातील कुणीही खांदा द्यायला आले नाही.

    त्यामुळे कुटुंबातील सात बहिणींनी पुढाकार घेत वडिलांना स्वतः खांदा देत अंत्यसंस्कार आटोपला. यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून गणेश प्रकाश ओगले यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर बहिष्काराचे फर्मान काढणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करून अटक करण्यात आले होती.