विधीमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती

महाराष्ट्र विधीमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यंक्षपदी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकलेखा समिती ही महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेची (Legislative Assembly and Legislative Council) संयुक्त समिती आहे.

 चंद्रपूर : महाराष्ट्र विधीमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यंक्षपदी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकलेखा समिती ही महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेची (Legislative Assembly and Legislative Council) संयुक्त समिती आहे. यामध्ये राज्याचे विनियोजन लेखे आणि नियंत्रक तसंच महालेखापरीक्षक यांचा अहवाल, त्याचं परिनिरीक्षण करणे अशा प्रकारची कामं असतात.

सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत या लोकलेखा समितीच्या सदस्यपदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते तथा माजी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी शालेय शिक्षण मंत्री अॅड. आशिष शेलार, माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री विनय कोरे, माजी राज्यमंत्री संजय सावकारे आदींचा समावेश असणार आहे.

नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांचा अहवाल तपासणे, राज्यपालांनी कोणत्याही जमा रकमांची लेखा परिक्षा करण्याबाबत किंवा साठा व मालासंबंधीचे लेखे तपासण्याबाबत नियंत्रक व महालेखापरिक्षक यांना निर्देशीत असेल त्याबाबतीत त्यांवच्याा अहवालाचा परिक्षण करणं ही लोकलेखा समितीची प्रमुख कर्तव्ये आहेत. यामुळे आता मुनगंटीवार यांच्यावर अनेक नव्या जबाबदाऱ्या असणार आहेत.